Doctor Day esakal
जळगाव

Doctor Day News : ‘काळजाला हात घालत’ 175 गरीब मुलांचा पुनर्जन्म

- सचिन जोशी, जळगाव

Jalgaon News : जन्मतः हृदयातील व्हॉल्व्हला छिद्र असणे, त्यातील वाहिन्यांमधील दोष शंभरातून एखाद्या मुलात आढळून येताच. जवळपास ९० टक्क्यांहून अधिक पालकांकडे यासाठी कराव्या लागणाऱ्या खर्चिक शस्त्रक्रियेसाठी पैशाची तजवीज नसते.

मात्र, डॉक्टरांच्या रूपातील काही देवदूतांनी गेल्या दोन वर्षांतच जळगाव जिल्ह्यातील जवळपास १७५ मुलांच्या काळजाला हात घालत अर्थात हृदयाची शस्त्रक्रिया करत त्यांना पुनर्जन्म दिलाय. (Doctor Day update Rebirth of 175 poor children Angelic Hospitality Difficult and expensive surgeries possible through donations from organizations Jalgaon News)

...तर शस्त्रक्रियाच पर्याय

अशाप्रकारचा दोष असलेल्या मुलांमध्ये काही लक्षणे आढळून येतात. त्यात हातपाय निळे-जांभळे पडणे, दम लागणे किंवा अन्य काही लक्षणे असू शकतात. या लक्षणांद्वारे त्या बालकाच्या हृदयातील दोषाबाबत अचूक निदान होणे गरजेचे असते. बालपणी नेमके तेच होत नाही आणि ते बाळ मोठे झाल्यावर लक्षणे वाढल्यानंतर हा दोष समोर येतो. बऱ्याच केसेसमध्ये वेळ निघून गेलेली असते. मात्र, योग्यवेळी निदान झाल्यावर अशा बालकांच्या हृदयावर शस्त्रक्रिया करणे हाच पर्याय असतो.

न परवडणारी शस्त्रक्रिया

मूलभूत आरोग्य सुविधांसाठी अजूनही संघर्ष करणाऱ्या भारतासारख्या देशात अशाप्रकारच्या दोषावर शस्त्रक्रिया करणे ९० टक्क्यांहून अधिक पालकांना परवडणारे नसते. पोटच्या गोळ्याचा जीव वाचवायचा असतो. मग अशावेळी देवदूतांचे एखादे पथक समोर येते, समुपदेशन करून योग्य दिशा दाखवते. त्यातून मार्ग सापडतो अन्‌ या गरीब वंचित मुलांवर अत्यंत कठीण व खर्चिक शस्त्रक्रिया पार पडते अन् तीही फोर्टिज्‌सारख्या दर्जेदार सुविधा असलेल्या हॉस्पिटलमध्ये.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

डॉ. भारुडेंचा ‘हृदयस्पर्शी’ समन्वय

विशेषतः बालकांचे हृदयरोगतज्ज्ञ म्हणून विख्यात असलेल्या डॉ. संदीप भारुडे यांनी हृदयदोष असलेल्या बालकांवरील उपचारावर आपली प्रॅक्टिस ‘फोकस’ केली आहे.

योग्य निदान करून गरज भासल्यास शस्त्रक्रियेसाठी रुग्णाच्या पालकांना तयार करणे, त्यासाठी त्यांचे समुपदेशन व पूर्ण मार्गदर्शन करणे, विविध सेवा संस्थांशी संपर्क करून खर्चिक शस्त्रक्रियेसाठी निधीची उपलब्धता, मुंबईतील ‘फोर्टिज्‌’ या जगात गुणवत्तापूर्ण असलेल्या हॉस्पिटल प्रशासन व तेथील तज्ज्ञांशी संपर्क व संवाद साधणे, अशा समन्वयाची जबाबदारी डॉ. भारुडेंवर असते.

डॉ. भारुडेंसह अन्य देवदूतांच्या या मोहिमेत जळगाव जिल्ह्यातील सुमारे १७५ मुलांवर अगदी अल्पदरात शस्त्रक्रिया केल्या आहेत आणि ही सर्व मुले तंदुरुस्त आहेत.

वर्षभरातून दोनदा शिबिर

अशाप्रकारच्या मुलांच्या तपासणीसाठी वर्षभरातून दोनदा शिबिर घेतले जाते. त्यासाठी स्थानिक डॉक्टरांसह मुंबईतील तज्ज्ञांची टीम असते.

साधारण दोन-अडीचशे मुलांची तपासणी होऊन त्यातून शस्त्रक्रिया गरजेची असलेली ५०-६० मुले आढळून येतात. नंतर त्यांच्यावरील शस्त्रक्रियेची प्रक्रिया सुरू होते.

"ज्यांच्या घरात दोन वेळच्या जेवणाची स्थिती नाही, अशांच्या कुटुंबात ही समस्या उद्‌भवली तर काय? या प्रश्‍नाला आम्ही या प्रयत्नांद्वारे उत्तर शोधून काढले आहे. आपल्या शिक्षणातून अशाप्रकारच्या रुग्णांना जीवदान देऊ शकलो, तरच या शिक्षणाचा उपयोग आहे, अन्यथा सर्व व्यर्थ."

-डॉ. संदीप भारुडे, हृदयरोगतज्ज्ञ

आज ‘डॉक्टर्स डे’. सेवेचा व्यवसाय झालेल्या आरोग्य क्षेत्रात अशाप्रकारची व्रतस्थ उदाहरणे अनेक दिसून येतात. त्यामुळे अजूनही डॉक्टरांमध्ये देव बघणाऱ्यांची संख्याही कमी नाही, म्हणूनच ही स्टोरी समाजासमोर आणणे कर्तव्य ठरते.

जन्मतः हृदयात दोष असलेली बालकं

हृदय शरीरातील सर्वांत संवेदनशील अन्‌ महत्त्वाचा अवयव. तो सतत योग्य गतीने धडकायलाच हवा. ते धडकणे थांबले, की आयुष्यही थांबतं. त्यामुळे ‘दिल धडकने दो...’ हे क्रमप्राप्त. मात्र, जन्मत: काही बालकांमध्ये हृदयदोष आढळून येतो. काहींच्या हृदयाच्या व्हॉल्व्हला छिद्र असते. काहींमध्ये हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिनीत दोष असतो, तर काहींच्या हृदयाच्या रचनेत दोष असतो. शंभरातून किमान एक बालक अशाप्रकारचा दोष घेऊनच जन्माला येतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT