Ram Mandir built with public participation. esakal
जळगाव

Jalgaon News : शेतकऱ्याकडून मंदिरासाठी 40 गुंठे जमीन दान; गुरुवारपासून प्राणप्रतिष्ठा सोहळा

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : तालुक्यातील वडली येथे ग्रामस्थांनी लोकसहभागातून भव्य राम मंदिर उभारले आहे. या मंदिरात गुरुवारपासून (ता.१६) तीन दिवस प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासह भरगच्च कार्यक्रम घेण्यात आले आहेत.

या सोहळ्यासाठी तेरा समित्या गठित करण्यात आल्या आहेत.(Donation of 40 guntha of land for temple by farmers jalgaon news )

वडली गावात राम मंदिर व्हावे, यासाठी अनेक वर्षांपासून ग्रामस्थांकडून संकल्प व प्रयत्न केले जात होते. मात्र प्रत्येक वेळी काही तरी अडचण येऊन ते पुढे जात होते. मात्र सहा महिन्यांपूर्वी एकत्र येऊन ग्रामस्थांनी लोकसहभागातून मंदिर उभारण्याचा निर्धार केला. त्यासाठी धर्मदाय आयुक्तांकडे ट्रस्टची नोंदणी करण्यात आली.

प्रल्हाद अर्जुन पाटील यांनी मुख्य रस्त्याला लागूनच शेतातील ४० गुंठे जमीन मंदिरासाठी दान केली. गावातील अनेक तरुण सरकारी, खासगी नोकरी व उद्योग, व्यवसायात आहेत. त्यांनी आर्थिक सहकार्यासह पुढाकारही घेतला अन् सहा महिन्यात मंदिर पूर्णत्वास आले.

मंदिर उभारणीसाठी आतापर्यंत २५ लाख रुपये खर्च आला आहे. गावकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने ही रक्कम ट्रस्टकडे जमा केली. आता रंगरंगोटीचे काम केले जात आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर प्राणप्रतिष्ठा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

एक्कावन्न जोडप्यांच्या हस्ते होमहवन

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त १६ ते १८ नोव्हेंबर या तीन दिवसात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात ५१ जोडप्यांच्या हस्ते होमहवन केले जाणार आहेत. पहिल्या दिवशी गावातून लेझीम खेळत मिरवणूक काढली जाणार आहे.

प्रायचित्त संकल्प, मंडप प्रवेश, गणेश पूजन, मातृका पूजन, नांदी श्राद्ध, आचार्य पूजन तर १७ ला द्वितीय सत्रात प्रधान मंडल, स्थापना, वास्तू मंडल, मूर्ती जलाधिवाससह इतर कार्यक्रम होतील.

तिसऱ्या दिवशी १८ ला स्थापित देवता हवन, प्रधानमूर्ती प्राणप्रतिष्ठा होईल व दुपारुन महाप्रसाद होणार असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष नारायण उंबरे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT