जळगाव : तरुणाला पैसे डबल करून देण्याच्या नावाखाली तब्बल ३१ लाखांची फसवणूक झाली. महेश तुकाराम भोळे (वय ३५, रा. आसोदा) खासगी नोकरीत असलेला तरुण सध्या कुटुंबासह जळगावातील सदोबानगरात राहतो. फेब्रुवारी २०२२ मध्ये त्याची ओळख औरंगाबाद येथील अरुण नागोराव अंभोरे यांच्याशी झाली. अंभोरे याने औरंगाबाद एमआयडीसीतील शेंद्रा येथे इंडोपर्ल नावाच्या शिंपल्यापासून मोती तयार करण्याची ‘शेती’ नावाची कंपनी स्थापन केली. त्यात त्यांची पत्नी, मुलगी व इतर तीन जण संचालक म्हणून काम पाहत आहेत. (double money lure cheated youth of 31 lakhs Jalgaon Fraud Crime)
हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...
अशी झाली फसवणूक
वेळोवेळी संपर्क करून १३ महिन्यांत पैसे डबल होतील, असे सांगून महेश भोळे यांच्याकडून त्याने एकूण ३१ लाख ५० हजार रुपये घेतले. त्याच्या बदल्यात अंभोरे यांनी दोन कोरे धनादेश दिले. मात्र, ते धनादेश वटले नाहीत. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महेश भोळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात संशयित अरुण अंभोरे, त्याची पत्नी मंदा अंभोरे, मुलगी दिलीप अंभोरे, राहुल शेळके, विनोद बाहेकर आणि आकाश आठल्ये (सर्व रा. शेंद्रा एमआयडीसी, औरंगाबाद) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. सहाय्यक निरीक्षक किशोर पवार तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.