BHR Patsanstha Fraud Case esakal
जळगाव

BHR Extortion Case : बीएचआर खंडणी प्रकरणी गठीत SIT वर संशय ?

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : बीएचआर पतपेढीतील कोटींच्या अपहार प्रकरणात दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी सव्वा कोटीची खंडणी मागितल्याप्रकरणी दाखल गुन्ह्याच्या तपासासाठी एसआयटी पथक नियुक्त केले आहे. मात्र, ‘एसआयटी’तील अधिकारी, कर्मचारीच वादग्रस्त असल्याची चर्चा आहे.

या गुन्ह्यात तत्कालीन विशेष सरकारी वकील ॲड. प्रवीण चव्हाण, लेखापरीक्षक सीए शेखर सोनाळकर, मद्यविक्रेता उदय पावर यांचा समावेश असून, तपास सुरवातीला गुन्हे शाखेकडे सोपविला होता. अनेक दिवस नेमका तपास कुणाकडे आहे, हेच स्पष्ट झाले नाही. नंतर अचानकपणे या तपासासाठी एसआयटी स्थापन झाल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. (Doubt on SIT in BHR extortion case LCB investigated Inclusion of controversial employees in SIT under discussion Jalgaon News )

तत्कालीन सरकारी वकील ॲड. प्रवीण चव्हाण यांच्यासह तिघांविरुद्ध दाखल खंडणीच्या गुन्ह्याच्या तपासासाठी विशेष तपास पथक तयार केले आहे. या पथकात दोन अधिकाऱ्यांसह चार कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मात्र, वादग्रस्त कर्मचाऱ्यांचा समावेश असल्यामुळे ‘एसआयटी’वर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे विशेष पथकाची मागणी कुणी केली, हे स्पष्ट झालेले नाही.

भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या मालमत्तेचे अवसायक जितेंद्र कंडारे व त्याच्या साथीदारांनी बेकायदा पद्धतीने विल्हेवाट लावल्याच्या गुन्ह्यात संशयित सुनील झंवर, त्यांचा मुलगा सूरज याच्यासह परिवाराला मदतीच्या बदल्यात कोट्यवधीची लाच मागितल्याप्रकरणी तत्कालीन सरकारी वकील ॲड. प्रवीण चव्हाण, शेखर सोनाळकर यांच्यासह चाळीसगावचे मद्यव्यापारी उदय पवार यांच्याविरुद्ध सूरज सुनील झंवर (३२, रा. साई बंगला, सुहास कॉलनी, जळगाव) यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात एक कोटी २० लाखांची खंडणी मागितल्याची तक्रार दिली होती.

पुण्यात दाखल या गुन्ह्याचे ठिकाण चाळीगाव असल्याने गुन्हा जळगाव जिल्‍हा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. गुन्हे शाखेचे निरीक्षक किशन नजन पाटील यांना कागदोपत्री सोपविल्याची नोंद केली होती. मात्र, तसा अधिकृत कुठलाच आदेश प्राप्त नसून तपास आपल्याकडे नसल्याचे श्री. पाटील यांनी स्पष्ट केले होते.

हेही वाचा : भारतीय क्रिकेटची नवी आशा- पृथ्वी शाॅ

‘एसआयटी’तील कर्मचारी वादग्रस्त

विशेष तपास पथकात पोलिस निरीक्षक संदीप पाटील, उपनिरीक्षक दीपक जगदाळे, हेडकॉन्टेबल विजय पाटील, नरेंद्र वारुळे, नाईक जीवन पाटील व मनोज सुरवाडे यांचा समावेश आहे.

यातील जीवन पाटील आणि मनोज सुरवाडे लॉकडाउन काळात मद्यतस्करीत संबंधितांना मदत केल्याच्या आरोपात बडतर्फ झाले होते, तर वारुळे यांच्याविरुद्ध एका महिलेसह जिल्हा विशेष शाखेच्या (डीएसबी) अधिकारी, कर्मचाऱ्यांना अश्लील मॅसेज पाठविल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात ते काही दिवस जेलमध्ये होते. आता ते जामिनावर बाहेर आहेत.

अशा सर्व वादग्रस्त कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली. तेव्हा अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके होत्या. ज्यांनी नंतर पुणे आर्थिक गुन्हे शाखेचा पदभार स्वीकारल्यावर ‘बीएचआर’मध्ये धडाकेबाज कारवाई केली होती.

तपासाचा बंदरबाट

मूळ पुण्यात दाखल गुन्हा चाळीसगाव पोलिसांत वर्ग झाला. चाळीसगाव पोलिस ठाण्यात वरिष्ठ निरीक्षक आहेत. त्यासोबतच ‘डीवायएसपी’पदावर आयपीएस अधिकारी अभयसिंग देशमुख (सहाय्यक पोलिस अधीक्षक) आहेत. अप्पर अधीक्षक रमेश चोपडे यांच्यासारखे कर्तबगार अधिकारी असताना, गुन्ह्याच्या तपासाचा भाग कागदोपत्री गुन्हे शाखेला सोपविण्यात आला. अर्थात, बालकथेत मांजरांना ज्याप्रमाणे माकड लोणी वाटतो. (बंदरबाट) याप्रमाणे या वादग्रस्त प्रकरणाच्या तपासाचे झाल्याची चर्चा सुरू आहे.

‘एसआयटी’चा साक्षात्कार कुठून?

पोलिस दलाच्या इतिहासात आजवर खंडणीच्या कलमांचे हायप्रोफाईल गुन्ह्यांसाठी यापूर्वी कितीवेळा अशा पद्धतीने विशेष ‘एसआयटी’ गठित केली आहे, तर या प्रश्नाचे उत्तर ‘नाही’, असेच एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिले. ‘एसआयटी’ नियुक्तीबाबत कुणाची खास मागणी होती का? ‘एसआयटी’ तपास पथकाची नावे कोणी निश्‍चित केली, अशा विविध प्रश्नांचा ऊहापोह सुरू असतानाच ‘एसआयटी’ नियुक्तीचा कुणाला साक्षात्कार झालाय, याचीही चर्चा रंगली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chetan Tupe won Hadapsar Assembly Election 2024: हडपसरमधील परंपरा मोडत चेतन तुपे यांचा विजय; प्रशांत जगताप यांचा पराभव

UP By Election: उत्तरप्रदेशात सुद्धा भगवे यश! पोटनिवडणुकीत योगींनी लोकसभेचे अपयश धुवून काढले, जाणून घ्या करणे

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: वांद्रे पूर्वमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वरुण सरदेसाई विजयी

Nanded Lok Sabha By Election Result 2024 : पोटनिवडणुकीतही काँग्रेसला मोठा झटका; गमावलेली नांदेडची जागा भाजपनं जिंकली

BJP Pravin Datke Won Nagpur Central Election : नागपूर मध्यचा गड भाजपने राखला, भाजपचे प्रवीण दटके 11516 मतांनी विजयी

SCROLL FOR NEXT