esakal
जळगाव

Jalgaon News : अ. भा. साहित्य संमेलनाची जबाबदारी पेलायला सक्षम : डॉ. अविनाश जोशी

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : तालुक्याला साहित्य, संस्कृती, इतिहास, औद्योगिक विकास आणि सामर्थ्य धाडसाची परंपरा आहे. (Dr Avinash Joshi statement about Amalner Marathi Literature Board is Able to fulfill responsibility of 97 All India Literary Conference)

त्यामुळे साऱ्यांच्या साक्षीने व सहकार्याने अमळनेर मराठी वाङ्‌मय मंडळ ९७ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची जबाबदारी पेलायला सक्षम आहे, असा विश्‍वास मराठी वाङ्‌मय मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी यांनी भारतीय मराठी साहित्य संमेलनस्थळ समिती सदस्यांसमोर व्यक्त केला. ही समिती रविवारी (ता. २३) आपला अहवाल अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या बैठकीत मांडणार आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेरला घेण्याविषयी स्थळ पाहणीला निवड समिती सदस्य मराठवाडा साहित्य परिषदेचे प्रा. किरण सगर, गोवा साहित्य परिषदेचे रमेश वंसरकर, अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या डॉ. उज्ज्वला मेहंदळे, मसाप पुणेच्या सुनीताराजे पवार, विदर्भ साहित्य परिषदेचे सचिव प्रदीप दाते, दिल्ली साहित्य अकादमी सदस्य नरेंद्र पाठक यांची समिती आली होती.

डॉ. अविनाश जोशी अमळनेर शहर व तालुक्याचा आढावा मांडताना म्हणाले, की साने गुरुजींची कर्मभूमी, श्रीमंत उद्योगपती अझीम प्रेमजी यांची कर्मभूमी, श्रीमंत प्रतापशेठ यांची दानभूमी, संत सखाराम महाराज यांची पुण्यभूमी, लीलाताईंची क्रांतिभूमी येथील १५० वर्षांपूर्वीच्या व्हिक्टोरिया लायब्ररीमुळे साहित्य, शिक्षण, उद्योग, इतिहास, धार्मिकतेचे तोरण अमळनेर शहराला बांधलेले असल्याने संपूर्ण महाराष्ट्रात अमळनेरचा आगळावेगळा ठसा आहे. १९५२ ला अमळनेरला साहित्य संमेलन भरले होते.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

त्यामुळे अमळनेरचे मराठी वाङ्‌मय मंडळ, इतर संस्था आणि लोकसहभागातून साहित्य संमेलन दर्जेदार, यशस्वीरीत्या सक्षमपणे पार पाडू परवानगी द्या, अशी भूमिका मांडली. स्थळ निवड समिती सदस्य डॉ. उज्ज्वला मेहंदळे, प्रा. सुनीताराजे पवार, नरेंद्र पाठक यांनी सकारात्मक असल्याबाबत मनोगत व्यक्त करून समितीसमोर अहवाल मांडला जाईल.

त्यांनतर समिती निर्णय घेईल, असे सांगितले. तत्पूर्वी खानदेश शिक्षण मंडळ संचालक नीरज अग्रवाल, प्रा. रमेश माने, प्राचार्य शेख, बजरंग अग्रवाल यांनी संमेलन अमळनेरला घेण्याबाबत आपली भूमिका मांडली. श्यामकांत भदाणे यांनी प्रास्ताविक केले. संदीप घोरपडे यांनी सूत्रसंचालन केले. नरेंद्र निकुंभ यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT