Accumulated rain water in Panchsheelnagar area of ​​Tambapura area and flood water that came to the drain in Tambapura area surrounded such houses.  esakal
जळगाव

Jalgaon Rain Damage : पहिल्याच पावसात तांबापुरा, फुकटपुरात घरात शिरले पाणी; नागरिकांवर आपत्ती

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Rain Damage : शहरात केवळ २० मिनिटे पडलेल्या जोरदार पावसामुळे तांबापुरा, फुकटपुरा, पंचशीलनगर भागांतील नागरिकांच्या घरात पाणी शिरले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

शहरातील इतर सखल भागांतही पाणी साचल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाचा पूर्णपणे बोजवारा उडल्याचे दिसून आले.

पावसाने गेल्या महिनाभरापासून दडी मारली होती. मात्र, गुरुवारी (ता. ६) दुपारी शहरात जोरदार पाऊस झाला. (due to heavy rain Water entered houses of citizens of Tambapura Phukatpura Panchsheel Nagar area jalgaon news)

२० मिनिटे झालेल्या पावसामुळे शहरातील सर्व सखल भागांत पाणी साचले. अनेक भागांतील रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे वाहनधारकांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले.

शहरातील तांबापुरा, फुकटपुरा व पंचशीलनगर भागात पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरले. या भागातील रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचले होते. अनेकांच्या घरात पाणी गेल्यामुळे अन्नधान्य, जीवनपयोगी साहित्य पाण्यात भिजले. या भागातील लोकांची तारांबळ उडाली.

‘न्हाई’च्या चुकीच्या कामाचा फटका

पंचशीलनगर, तांबापुरा, फुकटपुरा या भागाजवळून डी-मार्टकडे जाणाऱ्या रस्त्याचे नुकतेच क्रॉंकिटीकरण करण्यात आले. महामार्गाचेही काम करण्यात आले. ‘न्हाई’तर्फे हे काम करण्यात आले. सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी या ठिकाणी पाईप टाकले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मात्र, त्याचा कोणताही फायदा झाला नाही. अत्यंत चुकीच्या पद्धतीने रस्त्याचे काम करण्यात आल्याने त्यांचा फटका या भागातील रहिवाशांना बसला. या भागातील नागरिकांच्या घरातील जीवनावश्‍यक साहित्याचे नुकसान झाले. यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला.

नाले सफाईचे पितळ उघड

महापालिकेतर्फे पावसाळ्यापूर्वी नाले सफाईचे नियोजन केले जाते. यंदाही नाले सफाई केल्याचा दावा महापालिकेने केला. मात्र, या भागातून लेंडी नाला वाहतो. अनेक भागांत या नाल्याचे पाणी अडल्याचे दिसून आले, तर शहरातील इतर भागांतही नाल्याची तीच स्थिती असल्याचे दिसून आले.

आपत्ती व्यवस्थापन कोसळले

पावसाळ्यात शहरात कोणतीही आपत्ती आल्यास त्या ठिकाणी तातडीने महापालिकेचे कर्मचारी धावून जातात व नागरिकांना मदत करतात.

तांबापुरा, फुकटपुरा, पंचशीलनगर भागातील नागरिकांच्या घरात पाणी घुसून चार तास झाल्यानंतरही महापालिकेच्या आपत्ती विभागाचा कोणताही कर्मचारी या ठिकाणी पोचल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.

नुकसानभरपाई कोण देणार?

महापालिका व ‘न्हाई’च्या चुकीच्या कामांमुळे नागरिकांच्या घरात पाणी घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीची भरपाई कोण देणार, असा प्रश्‍नही नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

"महामार्गावर महामार्ग विभागाने काम करताना टाकलेले पाईप अत्यंत लहान असून, पाण्याचा निचरा होण्याची समस्या आहे. महापालिकेतर्फे दोन जेसीबी व कर्मचारी पाण्याचा निचरा करीत आहेत. मात्र, पाईप नवीन टाकल्यानंतरच पाण्याचा निचरा होणार आहे. याबाबत महामार्ग विभागाशी चर्चा करणार आहे." -उदय पाटील, आरोग्याधिकारी, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK ची साथ सुटताच Deepak Chahar च्या बहीण अन् पत्नीची स्पेशल सोशल मीडिया पोस्ट; पाहा काय लिहिलंय

Mumbai Local Train: मुंबईमध्ये उद्यापासून १३ नवीन AC लोकल धावणार

FIDE World Championship: भारताच्या डी गुकेशचं पराभवानंतर दुसऱ्या फेरीत कमबॅक, लढत ड्रॉ राखण्यात यश

Manoj Jarange Patil: ''एकदा सरकार स्थापन होऊ द्या.. तुम्ही तयारीला लागा'' मनोज जरांगे यांचं मराठा समाजाला आवाहन

ZIM vs PAK: १४६ धावांचे लक्ष्य एकट्याने चोपल्या ११३ धावा! २२ वर्षीय पाकिस्तानी फलंदाजाची हवा

SCROLL FOR NEXT