eye disease sakal
जळगाव

Eye Disease :10 पैकी 4 रुग्ण डोळ्यांच्या विकाराचे; वाढत्या तापमानामुळे डोळ्यांना त्रास

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : तापमानात वाढ झाल्यामुळे अनेकांचे डोळे लाल होणे, डोळ्यांना चुरचुर होणे, डोळे आग मारणे आदी विकार होत आहेत. त्यामुळे नेत्ररुग्णांची संख्या प्रकर्षाने वाढलेली दिसून येत आहे. (Due to increase in temperature number of eye patients has increased significantly jalgaon news)

यात मुख्यतः घराबाहेर पडणाऱ्या तरुण मुला-मुलींची संख्या वयोवृद्ध रुग्णांपेक्षा जास्त आहे. दर दहा रुग्णांमागे तीन ते चार रुग्ण उष्णतेमुळे डोळ्यांच्या समस्या घेऊन येत असल्याचे नेत्ररोगतज्ज्ञ सांगतात.

डोळ्यांना इजा होण्याची कारणे

फोटो केराटायटीसमुळे डोळ्यांना इजा होते. यात उन्हाळ्यात झाडांची पानगळ होते. हळूहळू उन्हाचा तडाखा वाढतो आणि डोळ्यांच्या तक्रारी सुरू होतात. डोळा दुखणे, लाल होणे, डोळ्यातून पाणी येणे, डोळ्यांना जंतुसंसर्ग होऊ शकतो. त्यासाठी नेत्ररोग तज्ज्ञांना दाखविणे गरजेचे असते.

त्याचप्रमाणे झाडांची पानगळ, हवेत पसरणारे परागकण, हवेतील धुळीमुळे डोळ्यांना ॲलर्जी होते. डोळ्यांना खाज येणे, डोळ्यातून पाणी येणे, डोळे लाल होणे, अशी लक्षणे आढळतात. चार ते दहा वयोगटांतील बालकांना जास्त ॲलर्जी होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यास ‘व्हर्नल कंजक्टीवायटीस’, असे म्हणतात. जळगाव शहरात धुळीचे प्रमाण जास्त असल्याने पायी चालणाऱ्यांमध्ये, तसेच दुचाकीस्वारांना जास्त त्रास होत असल्याचे दिसून येत आहे. याशिवाय, टीव्ही, संगणक, मोबाईलचा जास्त वापर केल्याने डोळे कोरडे होतात. डोळ्यांची आग होते. डोळ्यांना टोचणे, खाज येणे, पाणी येणे, अशा प्रकारचे त्रास सुरू होतात. अशावेळी नेत्रतज्ज्ञांचा वेळीच सल्ला घेणे गरजेचे असते.

अशी घ्या काळजी

संगणकाचा वापर करताना दर २० मिनिटांनी, २० फूट स्क्रीनपासून दूर बघणे. २० वेळा पापण्यांची उघडझाप करणे. स्क्रीन डोळ्यांच्या उंचीच्या खाली चार ते पाच इंच असावी, कॉम्प्युटर स्क्रीनपासून डोळ्यांचे अंतर २२ ते २८ इंच ठेवावे. मॉनिटर स्क्रीनवर अॅन्टिरिफ्लेक्टर स्क्रीन लावणे जास्त चांगले. पोहताना गॉगल वापरावा.

उन्हापासून असा करा बचाव

उन्हाळ्यात घराबाहेर पडताना टोपी, रुमाल, स्कार्फ किंवा सनग्लास वापरावा. पुरेसे पाणी प्यावे, परिपूर्ण आहार घ्यावा, पाणीदार फळे खावीत, डोळ्यांचा नैसर्गिक ओलावा टिकवून ठेवावा. व्हिटॅमिन ‘ए’ असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. यात पालेभाज्या, गाजर, काकडी, पपईचा समावेश असावा. डोळ्यांच्या संरक्षणासाठी चांगल्या सनग्लासचा उपयोग करा, अशी माहिती नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajesh Kshirsagar Won Kolhapur North Assembly Election : 'कोल्हापूर उत्तर'मधून राजेश क्षीरसागर तब्बल 30 हजार मतांनी विजयी; लाटकरांचा केला पराभव

karmala Assembly Election 2024 Result Live: करमाळ्यात नारायण आबा पाटील यांचा विजय, संजयमामा शिंदे यांना धोबीपछाड, बागल गटाचे अस्तित्व धोक्यात

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: राज ठाकरेंना मोठा धक्का, अमित ठाकरे पडले

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मोहोळमध्ये राजू खरे 29528 मतांनी आघाडीवर

Jaykumar Gore won Man Assembly Election 2024 Result: जयाभाऊचा विजयाचा चाैकार! माण-खटावमध्ये प्रभाकर घार्गे यांचा माेठा पराभव

SCROLL FOR NEXT