Health Tips : हाडांच्या मजबुतीसाठी कॅल्शिअमसोबतच व्हिटॅमिन डी-३, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन सी, प्रथिने आणि इतर अनेक प्रकारच्या खनिजांची आवश्यकता असते.
ग्रोथ हार्मोन पिट्यूटरी ग्रंथी आणि पुनरुत्पादक संप्रेरक असणे आवश्यक आहे. या सर्व गोष्टी साध्य करण्यासाठी आहारात योग्य गोष्टींचा समावेश आवश्यक आहे. (Due to junk food and soft drinks bone fragility decreases after few years jalgaon news)
जंकफूड व सॉफ्ट ड्रिंकमुळे काही वर्षांनी हाडांची ठिसूळता कमी होऊन त्रास जाणवू लागतो, अशा रुग्णांची संख्या वाढली आहे. लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनीच याचा वापर टाळल्यास, हाडे अनेक वर्षांपर्यंत बळकट राहतील, असा सल्ला आयुर्वेदाऱ्यांनी दिला आहे.
पितृभाव कमी होऊन मातृभाव वाढू लागला, की हाडांची कठीणता कमी होते. रक्तात कॅल्शियम व्हिटॅमिन डी-३, अल्कलाइन फॉस्फेट समतोल प्रमाणात असायला हवे.
दारू, सिगारेट, तंबाखूचे प्रमाणाबाहेर व्यसन करणे, बैठी जीवनशैली, मैदानी खेळ न खेळणे, लठ्ठपणा, अशा समस्यांमुळे हाडांच्या ठिसूळतेचा त्रास होतो. विशेषतः महिलांची मासिक पाळी बंद (रजोनिवृत्ती) होते. किंवा ज्या महिलांची गर्भाशयाची पिशवी काढली जाते, त्या महिलांमध्ये इस्ट्रोजेल, प्रगास्ट्रोरिन हार्मोन कमी होत असल्याने हाडांमध्ये ठिसूळता वाढते.
कॅल्शिअमशिवाय व्हिटॅमिन डी-३ ची कमतरता, स्टेराईडचा अतिरिक्त वापर, अनुवांशिकता आदी कारणे त्याला जबाबदार आहेत. यात थकवा येतो, कमजोरी वाढते, हाड आणि सांध्यामध्ये वेदना होतात. वारंवार हाडांचे फॅक्चर होते, कुबड निर्माण होते.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
डेक्सा स्कन ही सर्वांत अचूक निदान करणारी टेस्ट आहे. त्यात टी स्कोअर २.५ पेक्षा कमी असल्यास हाडांमध्ये ठिसूळता असल्याचे समजते.
यातून टाळता येतील भविष्यातील व्याधी
*नियमित व्यायाम, योगा- सूर्यनमस्कार, चालणे,
*सायकलिंग, मैदानी खेळ खेळणे
*पौष्टीक आहार म्हणून दूध, सुकामेव, नाचणी सत्व खाणे उत्तम
*पालक, मेथी, डाळींब, अंजीर, सीताफळ, पनीर, टमाटे, राजगिरा लाडू याचा आहारात सामावेश असावा
*ताणतणाव कमी असावा. व्यसनापासून दूर राहणे आवश्यक
*व्हिटामिन डी ३ साठी सकाळ ऊन फायदेशीर
हाडांच्या ठिसूळतेची प्रमुख कारणे
१) जंक फूडचे अतिसेवन
स्पर्धेच्या काळात माणसाला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला पुरेसा वेळ नाही. घाईघाईत अनेकजण जंकफूड खातात. त्यातून शरीरासाठी आवश्यक घटक मिळत नाहीत. जंकफूडच्या अतिसेवनामुळे असिडीटीचा त्रास जाणवतो. त्यामुळे शरीराला त्रास जाणवतो आणि शरीराची स्थिती पूर्वपदावर येण्यासाठी कॅल्शियमचा जास्त वापर होतो. त्यानंतर हाडांची समस्या उद्भवते.
२) सॉफ्ट ड्रिंकचे प्रमाण अधिक
सॉफ्ट ड्रिंकच्या अतिसेवनाने शरीरात ‘बफर’ म्हणून काम करणाऱ्या कॅल्शिअमचा वापर अधिक होतो. त्यामुळे शरीरातील कॅल्शियम काही दिवसांतच कमी होऊ लागते. पेशी व हाडातून कॅल्शिअम शोषून घेतले जाते. त्यातूनच हाडांची ठिसूळता उद्भवते. त्यामुळे सॉफ्ट ड्रिंक घेणे टाळणे हाच त्यावरील ठोस उपाय आहे.
३) आहारात असमतोल
वेळी-अवेळी जेवण, जंकफूडचे अतिसेवन, जागरण, विटॅमिन-डीचे प्रमाण कमी होणे, अशा कारणांमुळे हाडांच्या ठिसूळतेची समस्या निश्चितपणे उद्भवते. त्यामुळे कॅल्शियम असलेल्या पदार्थांचे सेवन सदृढ शरीरासाठी खूप फायद्याचे ठरते. सकाळी दहापूर्वी जेवण करावे. सूर्योदयापूर्वी उठावे आणि कोवळ्या उन्हात काही वेळ घालवावा. रात्री सूर्य मावळतीला जात असताना, जेवण करून घ्यावे. किमान सात ते आठ तासांची झोप आवश्यकच आहे.
"स्पर्धेच्या काळात हाडांची ठिसूळता ही गंभीर समस्या समोर येत आहे. मैदानी खेळाचा विसर, व्यायाम नाही, अपुरी झोप, तणावात वाढ, जंकफूडचे अतिसेवन, बैठे काम, जागरण, अशी कारणे त्याला कारणीभूत ठरत आहेत. शरीरातील कॅल्शियम कमी झाल्यानेच तशी समस्या निर्माण होत आहे. यावर अश्वगंधा, शतावरीसह इतर उपाय आयुर्वेदात सांगितले आहेत." -डॉ. अभिजित अहिरे, प्रभारी अधिष्ठाता, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, रुग्णालय
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.