IPS Officer Sakal
जळगाव

Jalgaon News : आयपीएस अधिकाऱ्याची प्रतिक्षा; डीवायएसपी गावित, वाघचौरे, जाधव, डेरे यांची बदली

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शहर आणि उपविभागात वाढती गुन्हेगारी, घरफेाड्या आणि पोलिस ठाण्यांच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी आयपीएस अधिकाऱ्याची प्रतिक्षा आहे.

गृहविभागाने केलेल्या बदल्यांमध्ये जळगाव उपविभागाचा पदभार असलेले संदीप गावित यांच्यासह श्री. वाकचौरे, जाधव आणि डेरे यांचा समावेश आहे. (due to Rising crime waiting for an IPS officer to control police station operation in jalgaon news)

जिल्ह्यामध्ये तीन अधिकारी नव्याने येणार आहेत. बदल्यांमध्ये जळगावचे डीवायएसपी संदीप गावित यांची पाचोरा विभागात बदली झाली आहे. राकेश जाधव यांची अमळनेर येथून जालना पोलिस प्रशिक्षण केंद्रात बदली झाली आहे.

आर्थिक गुन्हे शाखेचे डीवायएसपी भास्कर डेरे यांची पिंपरी चिंचवडच्या सहाय्यक पोलिस आयुक्तपदी बदली झाली आहे, तर भुसावळचे डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांची संगमनेरला उपअधीक्षकपदी बदली झाली आहे.

मुक्ताईनगर येथे डीवायएसपी म्हणून राजकुमार शिंदे बदलून येत आहेत, तर जळगावच्या संदीप गावित यांच्या जागी चंद्रपूर येथील डीवायएसपी सुशीलकुमार नायक येत आहेत. सोमनाथ वाकचौरे यांच्या जागी भुसावळला डीवायएसपी म्हणून विक्रांत गायकवाड येणार आहेत. बदल्यांमुळे पोलिस दलात नवीन शिस्त व बदल आगामी काळात बघायला मिळणार आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

जळगाव भाग रिक्तच

जळगाव उपविभागात सहा पोलिस ठाणे अंतर्गत साडेपाच लाख लोकसंख्येच्या शहरी, ग्रामीण हद्दीसह एमआयडीसी, रेल्वेचा काही भाग असा परिसर आहे. जिल्‍ह्याचे ठिकाण असल्याने गुन्ह्यांचा टक्का वाढत असतो.

त्यासह दंगली, शरीराविरुद्धचे गुन्हे, अवैध धंदे, वाळूमाफियांचा उपद्रव सर्वाधिक आहे. डीवायएसपी प्रशांत बच्छाव, सचिन सांगळे यांच्यानंतर डॉ. निलाभ रोहन या अधिकाऱ्यांनी जळगाव उपविभाग गाजवून गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यात यश प्राप्त केले होते. तशाच कर्तबगार अधिकाऱ्यायाची जळगावकरांना प्रतीक्षा आहे.

१४३ पोलिस निरीक्षक होणार डिवायएसपी

महाराष्ट्र राज्याच्या गृहविभागाने वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या पदोन्नतीची यादी जाहीर केली असून, राज्यातील तब्बल १४३ पोलिस निरीक्षकांना डीवायएसपी व पोलिस उपायुक्तपदावर पदोन्नती मिळाली आहे. जिल्‍ह्यातील तीन पोलिस निरीक्षकांची पदोन्नती झाली आहे.

त्यात शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांची कन्नड येथे, निरीक्षक दिलीप भागवत यांची उदगीर (जि. लातूर) येथे, तर बाबासाहेब बाजीराव ठोंबे यांची नाशिकच्या गुप्तचर प्रशिक्षण संस्थेत पदोन्नतीवर बदली झाली आहे. बदलीप्राप्त अधिकाऱ्यांना तत्काळ हजर होण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: ''मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत मी नाही'', देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; तावडेंच्या भूमिकेनंतर स्पष्टच बोलले

'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून लोकप्रिय अभिनेत्याची अचानक एक्झिट; आता 'हा' अभिनेता साकारणार भूमिका

Uddhav Thackeray Mumbai: ठाकरेंचा गड खालसा करण्यात येणार का भाजपला यश? मोदी शहांसह डझनभर मंत्री मुंबईत

Devendra fadnavis: योगींच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला देवेंद्र फडणवीसांचे समर्थन, म्हणाले- हा तर देशाचा इतिहास

Latest Maharashtra News Updates : पवारांसोबत जाण्याची वेळ येणार नाही, महायुतीला बहुमत मिळेल-एकनाथ शिंदे

SCROLL FOR NEXT