Varangaon Bus Station Chowk in of encroachment esakal
जळगाव

Jalgaon News : वाहातूक कोंडीमुळे जीव मुठीत धरुन करावा लागतो प्रवास

शहराचा दिवसेंदिवस विस्तार होत असताना येथील नागरी समस्यांची सोडवणूक करणारी यंत्रणा मात्र ढिम्मच आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शहराचा दिवसेंदिवस विस्तार होत असताना येथील नागरी समस्यांची सोडवणूक करणारी यंत्रणा मात्र ढिम्मच आहे.

परिणामी वरणगाव बसस्थानक चौक म्हणजे बसचे कमी आणि समस्यांचे आगार झाले आहे. (Due to traffic jams people have to travel dangerous way Jalgaon News)

शहरात वाहनांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे पार्किंगचा प्रश्न देखील ऐरणीवर येत आहे. त्यातच रस्त्यालगत सार्वजनिक ठिकाणी फळ, आणि खाद्य पदार्थ विक्रेत्यांनी दुकाने थाटल्याने वाहतूक कोंडी नित्याचा विषय झाला आहे.

बेशिस्त वाहतुकीला आळा घालण्यासाठी पोलिस यंत्रणा कमी पडते. अतिक्रमणांवर नियंत्रण ठेवण्यासह व्यावसायिकांना शिस्तीत बसविण्यासाठी प्रयत्न करावेत याचे कुणाला महत्व वाटत नाही. अतिक्रमणाबाबत नगर परिषद यंत्रणा आणि बेशिस्त वाहतुकीविषयी स्थानिक पोलिस यंत्रणा उदासीन असल्याची स्थानिक नागरिकांची भावना बनते आहे. त्यामुळे दोन्ही यंत्रणांनी एकत्र येऊन वाहतूक कोंडीचा विषय मार्गी लावला पाहिजे.

रस्त्‍यावर पथाऱ्या

शहरातील बसस्थानक चौक कायम वर्दळीचा परिसर आहे. या परिसरात नेहमीच स्थानिकांसह प्रवाशांची गर्दी असते. या गजबजलेल्या भागांत रिक्षा, हातगाडीवर फळे, खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांचा रस्त्यावर गराडा पडलेला आहे.

व्यवसाय करणे व्यवसायीकांचा हक्क असला तरी हे करत असताना संबंधितांकडून सर्रासपणे नियमांचे उल्लंघन होत आहे. भर रस्त्यात दुकान मांडून बसण्याने रस्ते वाहतुकीसाठी न राहता केवळ व्यावसायिकांना दुकान थाटण्यासाठी आहे की काय असा प्रश्न पडतो.

रस्त्यावर दुकानांचा त्रास कमी कि काय म्हणून रिक्षाचालक रस्त्यात रिक्षा आडवी लावून जेव्हा प्रवासी भरू लागतात. त्यावेळी रस्त्यातील वाहतूक कोंडीत सापडलेल्या नागरिकांची अवस्था फसल्यासारखी होते. रस्त्याच्या मधोमध रहदारीला अडथळा निर्माण होईल, अशारीतीने हातगाडी लावून फळ विक्री करणे यामुळे पादचारी किंवा इतर वाहनांना अडथळा निर्माण होत आहे.

यंत्रणेचा वचक नाही

शहरातील मुख्य भागांत रिक्षांचे व हातगाड्यांचे अतिक्रमण करणाऱ्यांवर पोलिसांचा वचक राहिलेला नाही. नागरिकांच्या तक्रारी येताच पोलिस यंत्रणेकडून कारवाया होतात पण पोलिसांची पाठ फिरताच परिस्थिती जैसे थे ! सारखी होते.

यां वर कायमस्वरूपी जरब नसल्याने पोलिसिंगचे या भागात दर्शन घडण्याची गरज आहे. एकूणच नगर परीषद प्रशासन व पोलिस यंत्रणेकडून या विषयाला महत्त्वच दिले जात नसल्याने या परिसरातून प्रवास नागरिकांची डोकेदुखी बनली आहे. मंगळवार हा आठवडे बाजाराचा दिवस असल्याने मंगळवारी रस्त्यावरून चालणे सुद्धा अवघड होत आहे.

पार्किंग झोनची गरज

वाहनासाठी पार्किंगची सोय नसल्यामुळे सोयीनुसार जागा मिळेल त्या ठिकाणी बेशिस्तपणे गाड्या उभ्या कराव्या लागतात. स्थानिक व्यावसायिकांच्या दुकानासमोर विक्रेते बसून दुकान झाकली जाउ नये म्हणून स्वता काही मालकांनी दुकानांचा पसारा वाढवीत समोरच्या मोकळ्या जागांवर हक्क दाखवीत रस्त्यावर फळ आणि खाद्य विक्रेत्यांना जागा भाडे वसुलीतून कमाई सुरु केली आहे.

पण अशा अवैध पोट भाडेकरुच्या उपद्रवाबाबत नगरपरिषद व पोलीस यंत्रणाच दुर्लक्ष करीत असल्याने अवैध वाहतूक करणाऱ्यांची मुजोरी वाढली आहे. भरधाव वेगात वाहने चालवून वरणगावकरांच्या जिवाशी खेळ सुरु आहे.

"दुकानात येणा-या ग्राहकांसाठी गाडी पार्किंग सुविधा नसल्याने सोयीनुसार ते रस्त्यावरच मिळेल त्या ठिकाणी गाडी लावून रहदारीस अडथळा निर्माण करीत आहे. नगर परीषद व पोलीस प्रशासनाने. याकडे लक्ष देण्याची गरज आहे." - स्थानीक पादचारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्राच्या मतमोजणीला सुरुवात, पहिला कल आला हाती...

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: कोपरी पाचपाखाडीमधुन एकनाथ शिंदे आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT