भुसावळ (जि. जळगाव) : येथील श्रीमती प. क. कोटेचा महाविद्यालयाने (College) विनाअनुदानित तत्त्वावर काम करणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या ईपीएफची रक्कम भरली
नसल्याबाबत महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी तथा कुंदन धर्मा तायडे व त्यांचा मुलगा भरत कोळी यांनी वेगवेगळ्या तक्रारी केल्या होत्या. (E P F office ordered to pay 6 lakh rupees over fake sign case to Kotecha College jalgaon news)
या तक्रारींच्या अनुसरून महाविद्यालयाने २०१७ मध्ये आलेल्या कर्मचारी नामांकन अभियान योजनेचा बेकायदेशीररित्या वापर करून रक्कम भरली. परंतु सदर रक्कम भरण्यासाठी महाविद्यालयाने कर्मचाऱ्यांचा फॉर्म ११ भरताना कर्मचाऱ्यांच्या खोट्या सह्या केल्या.
त्या कर्मचाऱ्यांनी याबाबत तक्रार केली. त्या अनुषंगाने ईपीएफ कार्यालयाने सखोल चौकशी करून सह्या खोट्या केल्याबाबत कर्मचारी नामांकन अभियान २०१७ नुसार केलेला भरणा व त्यातील सूट रद्द करून कोटेचा महाविद्यालयाला ई.पी.एफ. कार्यालयाकडून दणका देत सहा लाख रुपये भरण्याचे आदेश दिले आहे.
कोटेचा महाविद्यालयात २०१२ मध्ये प्राचार्यपद रिक्त झाले होते. प्राचार्यपद भरण्यासाठी प्रक्रिया राबविण्यात आली होती. या प्रक्रियेदरम्यान विद्यापीठ अनुदान आयोग, कवयित्री विद्यापीठ तसेच शासनाचे निकष न पाळता डॉ. मंगला साबद्रा यांची प्राचार्यपदी नियुक्ती करण्यात आली.
हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण
या बेकायदेशीर भरती विरोधात कुंदन तायडे यांनी विद्यापीठाकडे तक्रार दाखल केली होती. तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. ही याचिका प्रलंबित आहे.
प्राचार्य पद होणार रिक्त
कोटेचा महाविद्यालयातील प्राचार्य पद ३१ मार्चला रिक्त होत आहे. यासाठी नवीन प्राचार्य भरती संदर्भात महाविद्यालयाने जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या पदावर विद्यमान प्राचार्य डॉ. मंगला साबद्रा यांना पुन्हा नियुक्ती देण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा शिक्षण क्षेत्रात सुरू असल्याची माहिती कुंदन धर्मा तायडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी प्रा. शैलेश कुलकर्णी देखील उपस्थित होते.
"आपण याबाबत काहीही माहिती नसल्याने यावर बोलणे उचित होणार नाही. याबाबत माहिती घेतली जाईल." - डॉ. मंगला साबद्रा, प्राचार्य, कोटेचा महाविद्याल, भुसावळ
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.