This was situation outside showroom of Rajmal Lakhichand Jewelers after ED raids it for inspection esakal
जळगाव

Jalgaon Raid News : वाहनांच्या ताफ्यासह 40 अधिकाऱ्यांचा फौजफाटा; समन्स, वॉरंटसह सर्व तयारीची सज्जता

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Raid News : राजमल लखीचंद ज्वेलर्ससह ईश्‍वरलाल जैन व मनीष जैन यांच्या मालकीच्या विविध आस्थापनांच्या तपासणीसाठी गुरुवारी (ता. १७) पहाटेच जळगावात दाखल झालेल्या सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) पथकाने समन्स, वॉरंटसह सर्व तयारीची सज्जता ठेवली आहे.

आर. एल. च्या संचालकांनी गतकाळात घेतलेल्या व नंतर थकीत होऊन वादग्रस्त बनलेल्या कोट्यवधींच्या कर्ज प्रकरणासह अन्य मुद्दे चौकशीसाठी ‘ईडी’च्या रडारवर असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. (ED team raided Rajmal Lakhichand Jewelers and other establishments jalgaon news)

राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा माजी राज्यसभा सदस्य ईश्‍वरलाल जैन व त्यांचे पुत्र माजी आमदार मनीष जैन यांच्या मालकीच्या राजमल लखीचंद ज्वेलर्स व अन्य आस्थापनांवर गुरुवारी ‘ईडी’ पथकाने छापा टाकला. दहा वाहनांच्या ताफ्यासह ४० अधिकारी-कर्मचारी विविध दहा- बारा वाहनांमधून आरएल ज्वेलर्ससह नेक्सा व मानराज या शोरूमसह निवासस्थानांवर धडकला.

आर. एल. ज्वेलर्सवरील कारवाई सुरू झाल्यानंतर शोरूम बंद करण्यात आले. तरीही काही ग्राहक दुकानाबाहेर गर्दी करत होते. त्यामुळे स्वत: मनीष जैन यांनी काही वेळ शोरूमच्या बाहेर येत स्थितीचा आढावा घेतला. तसेच ग्राहकांची समजूत काढली.

ईडी’च्या पथकाने काही कागदपत्रे ताब्यात घेत मनीष जैन यांची चौकशी केली. त्यांच्याकडून विविध व्यवहारांची माहिती जाणून घेतली. ईश्‍वरलाल जैन यांची प्रकृती ठीक नसल्याने ते उपस्थित नसल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या संपूर्ण तपासणीत ‘ईडी’चा फोकस आर. एल. ज्वेलर्सने स्टेट बँक ऑफ इंडिया व अन्य वित्तीय संस्थांकडून घेतलेल्या कर्ज प्रकरणावर असल्याचे सांगण्यात आले. कोट्यवधींच्या कर्जाची थकबाकी आणि त्यानंतर या कर्जाचे झालेले सेटलमेंट यासंबंधी पथक तपासणी करीत आहे. सुवर्णपेढीसह अन्य आस्थापनांच्या नावे घेतलेल्या कर्ज प्रकरणाचीही चौकशी होणार आहे.

संचालकांशी संपर्क नाही

या तपासणी व कारवाईसंदर्भात ईश्‍वरलाल जैन व मनीष जैन यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचे भ्रमणध्वनी बंद असल्याने संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया समजू शकली नाही.

मोबाईल ताब्यात घेत चौकशी

राजमल लखीचंद ज्वेलर्स शोरूमवर जाताच ‘ईडी’च्या पथकाने कर्मचाऱ्यांना बाहेर काढले. मनीष जैन, कुटुंबीय तसेच व्यवस्थापकांचे मोबाईल ताब्यात घेतले. सकाळपासूनच आस्थापनेतील सर्व कागदपत्रे, दागिन्यांच्या साठ्याच्या नोंदी, व्यवहाराच्या नोंदी आदींसह महत्त्वाच्या फायली ताब्यात घेतल्या. नेक्सा व मानराज मोटर्स शोरूमवरही सर्व प्रकारच्या फायली, कागदपत्रे ताब्यात घेतली. पथकातील अर्थ विषयातील तज्ज्ञांच्या मदतीने कागदपत्रांची पडताळणी सुरू झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly: आला, आला, आला...पाटील आला! सरकार कुणाचेही असो; रुबाब 'पाटलां'चाच! राज्यातून २४ 'पाटील' पोहोचले विधानसभेत

SMAT 2024-25: कॅप्टन श्रेयस अय्यर-ऋतुराज गायकवाड येणार आमने-सामने; मुंबई-महाराष्ट्र संघात आज लढत

सातारा जिल्ह्यातील नेत्यांच्या मुंबईत गाठीभेटी; महायुतीच्या आमदारांसोबत उदयनराजेंनी घेतली फडणवीस, पवारांची भेट

IND vs AUS 2nd Test: रोहित आला पण... टीम इंडियाचा युवा फलंदाज दुसऱ्या कसोटीला मुकणार, दुखापतीचे ग्रहण

Latest Marathi News Updates : अंधेरी परिसरात इमारतीला आग, अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल

SCROLL FOR NEXT