Eknath Khadse- Girish Mahajan esakal
जळगाव

Eknath Khadse : गिरीश महाजनांचा आरोग्यदूत तुषार जगताप हा ‘गुटखाकिंग’ : एकनाथ खडसेंचा आरोप

सकाळ वृत्तसेवा

Eknath Khadse : भाजप नेते गिरीश महाजन यांचा आरोग्यदूत तुषार जगताप हा ‘गुटखाकिंग’ असून, त्याच्याकडून जामनेर तालुक्यातील नेरी, नांद्रा यासह परिसरात दर आठवड्याला दहा, बारा लाखांचा गुटखा विकला जातो, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार एकनाथ खडसे यांनी केला.

शहरातील बाजार समिती संचालक मंडळाच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला आहे. (Eknath Khadse Allegation on girish mahajan about tushar jagtap jalgaon news)

पत्रकार परिषद सुरू असताना खडसे यांना नांद्रा येथील त्यांचा कार्यकर्ता राजेंद्र आनंदा गांगुर्डे याने तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असल्याची भ्रमणध्वनीवर माहिती दिली. दरम्यान, आमदार खडसे म्हणाले, की महाजन यांचे दुसरे नाशिकचे सहकारी कोष्टी याच्यावरही मोक्का लावण्यात आला असून, महाजन यांच्या आशीर्वादाने अनेक गुन्हेगार जिल्ह्यात सेटल होत आहेत.

शासकीय रिक्त पदांबाबत खडसे म्हणाले, जिल्ह्याचे ग्रामविकासमंत्री असताना बहुतांश तालुक्यात शासकीय कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. एकट्या बोदवड तालुक्यात ३८ ग्रामपंचायती असून, यात ४९ गावे आहेत. तालुक्यात केवळ १४ ग्रामसेवक आहेत. शासकीय कार्यालयाची बिकट परिस्थिती आहे.

जिल्ह्यात तीन मंत्री आहे. ग्रामविकास खात्याचे कार्यक्षम मंत्री असूनही एवढ्या रिक्त जागा का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या रिक्त पदांबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवर बोललो असता शिक्षक भरती आठ दिवसांत होणार असल्याचे सांगण्यात आले, परंतु अद्याप निर्देश प्राप्त झालेले नाहीत, असे त्यांनी सांगितले.

सरकार ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम राबवत आहे. मात्र नागरिकांना दाखल्यांसाठी महिना महिना वाट पाहावी लागत आहे. खडसे यांनी जलजीवन मिशन योजनेंतर्गत तालुक्यातील ४४ गावांमध्ये कामे मंजूर असूनही योजना ठेकेदाराचे भले करणारी आहे. याबाबत विधानसभेत लक्षवेधी प्रश्न मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बोदवड नगरपंचायत पाणीपुरवठा योजनेबाबत पत्रकारांनी विचारले असता, ओडीए ९२ कोटीची योजना झाली आहे. त्या जलवाहिनीची एका वर्षापासून पडताळणी घेतली जात आहे. प्रत्यक्ष जलवाहिनी सुरू का करण्यात येत नाही, असा प्रश्न खडसे यांनी उपस्थित केला. या वेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, माजी गटनेता कैलास चौधरी, रामदास पाटील, गटनेता जफर शेख, प्रदीप बडगुजर, विजय चौधरी आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निवडून आल्यानंतरही पक्षासोबतच राहू; ठाकरेंनी लिहून घेतलं प्रतिज्ञापत्र

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT