Eknath Khadse : पंढरपूर येथे भाविकांसाठी बांधण्यात येत असलेल्या आमदार यात्री निवासाचे बांधकाम निधीअभावी अपूर्णावस्थेत असल्याबाबत एकनाथ खडसे यांनी विधानपरिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित केला. (Eknath Khadse demand in Legislative Council to complete work of Pandharpur MLA Yatri Niwas jalgaon news)
एकनाथ खडसे म्हणाले, की पंढरपूर (जि. सोलापूर) येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांच्या रहिवासासाठी मंदिर परिसरात सर्वपक्षीय आमदारांच्या निधीतून आमदार यात्री निवासाचे बांधकाम आराखड्यास २००५ मध्ये मंजुरी मिळाली आहे.
त्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाल्यानंतर मंदिर समितीच्या सर्व्हे क्रमांक ५९/१ वर २००९ मध्ये आमदार यात्री निवासाचे बांधकाम सुरू होऊनही निधीअभावी मागील १३ वर्षांपासून प्रकल्प अपूर्णावस्थेत आहे.
या प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय?, चौकशीच्या अनुषंगाने आमदार यात्री निवासाचे निधीअभावी अपूर्णावस्थेत असलेल्या बांधकामास निधी उपलब्ध करून, यात्री निवासी बांधकाम पूर्ण करण्याबाबत कोणती कार्यावाही केली व भाविकांच्या सोयीसाठी बांधकाम पूर्ण करण्याची त्यांनी मागणी केली.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
बांधकाम मंत्र्यांचे उत्तर
या प्रश्नाला सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, की या कामास आमदारांच्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत एकूण चार इमारतींच्या बांधकामास ११ जुलै २००७ च्या शासन निर्णयान्वये सात कोटी १४ लक्ष रकमेस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
प्रशासकीय मान्यता आदेशात, उपलब्ध निधीच्या तरतुदीनुसार बांधकाम टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्याविषयी नमूद केले आहे. त्यामुळे प्राप्त निधीच्या प्रमाणात अंदाजपत्रक तयार करून त्यास तांत्रिक मान्यता देण्यात आली.
त्यानुसार कामे पूर्ण करून, इमारत वापरण्यायोग्य करून हस्तांतरित केली आहे, तसेच उर्वरित निधी अद्याप उपलब्ध न झाल्याने, उर्वरित तीन इमारतींचे बांधकाम हाती घेण्यात आलेले नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.