मुक्ताईनगर : येथील शासकीय कृषी महाविद्यालय २०१५ पासून नियमित सुरू आहे. परंतु महाविद्यालयासाठी पद भरती मंजूर असूनही अद्यापपर्यंत पद भरती करण्यात आली नाही, ही बाब लक्षात घेऊन आमदार एकनाथ खडसे यांनी हिवाळी अधिवेशनात विधानपरिषदेमध्ये औचित्याच्या मुद्द्याद्वारे हा प्रश्न मांडून सरकारचे लक्ष वेधले. त्याला कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी उत्तर दिले. (Eknath Khadse question in winter session abdul sattar answer about Agriculture college approved post Jalgaon News)
या वेळी उत्तर देताना अब्दुल सत्तार म्हणाले, की वित्त विभाग, शासन निर्णयानुसार ४ मे २०२२, ४ जून २०२१ व ३० सप्टेंबर २०२२ अन्वये पदभरतीवर निर्बंध घालण्यात आले होते. वित्त विभाग शासन निर्णय ३१ ऑक्टोबर २०२२ अन्वये पदभरतीवरील निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली असून, ज्या विभागांचा किंवा कार्यालयाचा सुधारित आकृतिबंध अद्याप अंतिम झालेला नाही, अशा विभाग, कार्यालयातील गट अ , गट कमधील (वाहनचालक व गट -ड संवर्गातील पदे वगळून) सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदाच्या ८० टक्के मर्यादेपर्यंत रिक्त पदे भरण्यास मुभा देण्यात आली आहे. त्यानुसार रिक्त पदे भरण्याबाबतची कार्यवाही विद्यापीठ स्तरावर करण्यात येईल, असे अब्दुल सत्तार यांनी सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.