Eknath Khadse News : भाजपचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेकांशी भावनिक युती केली आहे. राजकारणात युती आवश्यक आहे, असे ते म्हणाले. म्हणजे ‘सोयीनुसार राजकारण’, असा त्यांचा बोलण्याचा अर्थ आहे.
त्यामुळे भविष्यात एमआयएमलाही भाजपसोबत घेऊ शकतील, अशी टीका माजी मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी पत्रकारांशी बोलताना केली. (Eknath Khadse statement about Fadnavis politics of convenience jalgaon news )
भारतीय जनता पक्षाच्या आमदारांचा मेळावा मुंबईत झाला. त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही शिवसेनेशी भावनिक, तर राष्ट्रवादीशी राजकीय युती केली असल्याचे म्हटले होते. त्याबाबत श्री. खडसे म्हणाले, की देवेंद्र फडणवीस यांनी अनेकांशी अशी भावनिक युती केली आहे.
राजकारण हे राजकारण असते. त्यात युती आवश्यक असते, असे श्री. फडणवीस यांनी म्हटले आहे. त्यामुळे भविष्यात ते कोणाशीही युती करणार असल्याचे दिसत आहे. ते आज एमआयएमशी युती करणार नाही, असे म्हणत असले तरी काश्मीरमध्ये मेहबूबा मुफ्ती यांच्याशी त्यांनी युती केली होती. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही एमआयएमशी युती करणार नाही, असे कसे म्हणता येईल. ते एमआयएम, वायएसआर, वंचित आघाडीशीही भविष्यात युती करून आपले सोयीनुसार राजकारण करतील.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
अजित पवार यांच्या सत्तेतील निर्णयाबाबत ते म्हणाले, की अजित पवार यांची काम करण्याची पद्धत धडाडीची आणि झटपट निर्णय घेण्याची आहे. मात्र, आता तीन पक्षांचे सरकार आहे. त्यामुळे त्यांना आता एकट्याने निर्णय घेणे शक्य होणार नाही.
देवेंद्र फडणवीस २०१४ पासून राजकारणात अधिक सक्रिय झाल्यापासून राज्याच्या राजकारणात वाईट अनुभव आले आहेत. मलाच आले, असे नाही तर अनेकांना ते आले आहेत. गेल्या ४० वर्षांत असे घाणेरडे राजकारण आपण पाहिले नव्हते.
माझ्याविरुद्ध बोलतो का? तुझ्या मागे ईडी लावतो. तुझ्या मागे ॲन्टीकरप्शन लावतो. तुझ्या कुटुंबाला जेलमध्ये टाकतो, अशा प्रकारचे गलीच्छ राजकारण सध्या सुरू आहे. त्यामुळे आता या राजकारणाचा किळस आला आहे, असे जनता म्हणते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.