Accidental car esakal
जळगाव

Jalgaon Accident News : भरधाव कारच्या धडकेत विद्यार्थिनीसह वृद्ध ठार; शेतकरी जखमी

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Accident News : पाचोरा -जळगाव राष्ट्रीय महामार्गावर गोराडखेडा गावाजवळ जळगावकडे भरधाव जाणाऱ्या कारच्या धडकेत विद्यार्थिनी व वृद्ध ठार झाले असून, एक जखमी विद्यार्थिनी व वृद्धास उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. (Elder and student killed in collision with speeding car at pachora jalgaon accident news)

गुरुवारी (ता.४) सायंकाळी सहाच्या सुमारास स्विफ्ट कार (क्रमांक एमएच १४, ९२७६) पाचोऱ्याकडून जळगावकडे जात असताना शाळेतून आपल्या घराकडे जात असलेल्या विद्यार्थिनींच्या सायकलीवर धडकली.

त्यात शिंदे विद्यालयाची दुर्गा भागवत पवार (वय १६) ही विद्यार्थिनी डोक्याला जबर मार लागल्याने जागीच ठार झाली तर तिची मैत्रीण ऋतुजा राजेश भोईटे (वय १६) ही फेकली जाऊन जखमी झाली. त्यानंतर ही कार समोर चालत असलेल्या सुभाष रामभाऊ पाटील (वय ६३) तसेच परशुराम पाटील यांच्या अंगावर धडकली.

त्यात सुभाष पाटील हे जागीच ठार तर परशुराम पाटील हे जखमी झाले. जखमी ऋतुजा भोईटे हिच्यावर पाचोरा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, परशुराम पाटील यांना जळगाव येथे उपचारार्थ हलविण्यात आले आहे.

अपघाताचे वृत्त कळताच गोराडखेडा ग्रामस्थांनी अपघात स्थळाकडे धाव घेतली व जखमींना ग्रामीण रुग्णालयात हलविले. त्यानंतर ग्रामस्थांनी ग्रामीण रुग्णालय व पाचोरा पोलिस ठाण्यात धाव घेऊन कारमधील युवकांना आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी केली. मृत दुर्गा पवार ही स्थानिक गुन्हे शाखेचे हवालदार लक्ष्मण पाटील यांची भाची असून, ती कुटुंबातील एकटी मुलगी होती.

भावाच्या अंत्यसंस्काराला आले अन्..

मृत सुभाष पाटील हे मुलाकडे पुणे येथे वास्तव्यास आहेत. त्यांच्या भावाचे बुधवारी (ता. ३) निधन झाल्याने ते भावाच्या अंत्यसंस्कारासाठी गोराडखेडा येथे आले होते.

शुक्रवारी अस्थी विसर्जनाचा कार्यक्रम करून ते पुणे येथे परत जाणार होते. परंतु भरधाव कार काळ बनून आली व तिने त्यांचा जीव घेतला.

महामार्गावर आक्रोश

मृत दुर्गा पवार ही चार बहिणींच्या कुटुंबातील एकटी मुलगी असल्याने तिच्या अपघाती मृत्यूमुळे पवार कुटुंबीय कमालीचे खचले आहेत.

दरम्यान, गोराडखेडा येथील संतप्त ग्रामस्थांनी अपघाताच्या घटनेनंतर राष्ट्रीय महामार्गावर आक्रोश केल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाली. संतप्त ग्रामस्थांनी अपघातग्रस्त कार जाळण्याचा प्रयत्न केला.

‘त्या’ आल्या नसत्या तर...

भरधाव कारने चौघांना चिरडल्यानंतर त्याच वेळी जळगावकडून पाचोऱ्याकडे येत असलेल्या महिला पोलिस नाईक शारदा भावसार यांनी मोठ्या हिमतीने संतप्त जमावाला शांत करून कारमधील युवकांना वाहनाने पोलिस ठाण्यात आणले.

अन्यथा संतप्त ग्रामस्थांकडून कारमधील बेधुंद तरुणांना चांगलाच प्रसाद ग्रामस्थांनी दिला असता. त्यातून मोठा अनर्थ हे घडला असता. कारमधील सर्व युवक जळगावचे असल्याचे सांगत असून ते दारूच्या नशेत धुंद असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT