Jalgaon Crime News : लोहटार (ता. पाचोरा) येथील वृद्ध पाटील दाम्पत्याने पाचोरा पोलिसांना फोन करून आम्ही आत्महत्या करत आहोत, असे कळवले व विषारी द्रव सेवन केले. पोलिसांनी लगबगीने घटनास्थळी पोहोचून दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
परंतु सोमवारी (ता. १०) दोघांचा मृत्यू झाला. (elderly Patil couple called Pachora police and informed that they were committing suicide jalgaon crime news)
पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. परिवहन महामंडळाचे निवृत्त कर्मचारी ईश्वर नामदेव पाटील (वय ७८) व त्यांच्या पत्नी प्रमिला पाटील (वय ७२) हे दाम्पत्य दोन मुले, सुना, नातवंडे या कुटुंबीयांसह लोहटार येथे वास्तव्यास आहेत. हा परिवार धार्मिक वृत्तीचा, सुस्वाभावी, सरळ मार्गी व आपल्या कामधंद्यात मग्न असल्याने एक आदर्श परिवार म्हणून या परिवाराची ग्रामस्थांना ओळख होती.
असे असताना शनिवारी (ता. ८) पहाटे चारच्या सुमारास ईश्वर पाटील यांनी पाचोरा पोलिस ठाण्यात फोन केला, की मी लोहटारहून ईश्वर पाटील बोलतोय, मी व माझी पत्नी संसाराला कंटाळून स्वखुशीने आत्महत्या करीत आहोत. त्यासाठी कुणालाही कारणीभूत अथवा जबाबदार धरू नये, असे सांगून त्यांनी फोन बंद केला.
या फोनच्या आधारे पोलिसांनी लगबगीने लोहटार येथे जाऊन प्रकार जाणून घेतला असता ईश्वर पाटील व प्रमिला पाटील या दोघांनी विषारी औषध सेवन केल्याने अत्यवस्थ झाले होते. पोलिसांनी तातडीने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी शर्थीचे उपचार करून त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
परंतु सोमवारी (ता. १०) मध्यरात्री दोनच्या सुमारास प्रमिला पाटील यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज थांबली तर सोमवारी (ता. १०) सकाळी आठला ईश्वर पाटील यांनीही अखेरचा श्वास घेतला. दोघांच्या निधनाची बातमी गावात पोहोचतात सारे गाव सुन्न झाले. मृत दाम्पत्यांच्या मागे दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
प्राप्त माहितीनुसार शुक्रवारी (ता. ७) रात्री सर्व परिवाराने सोबत भोजन घेतले. सर्व काही सुरळीत असताना या वृद्ध दाम्पत्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले असावे? असा प्रश्न सर्वांना भेडसावत आहे. पोलिसांना घटनास्थळावर चिट्ठी मिळाली असून, त्यात आम्ही संसाराला कंटाळून स्वखुशीने आत्महत्या करत आहोत.
त्याबाबत कोणालाही कारणीभूत अथवा जबाबदार धरू नये, असा मजकूर असून, या दाम्पत्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले असावे? याच्या मुळापर्यंत जाण्याचा पोलिस प्रयत्न करत आहेत. पोलिस निरीक्षक राहुल खताळ तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.