Jalgaon Market Committees esakal
जळगाव

Market Committee Election : बोदवड बाजार समितीच्या निवडणुकीस स्थगिती

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यातील बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Market Committee Election) निवडणुकीला स्थगिती देण्यात आली असून, याबाबतचे शासकीय परिपत्रकही जारी करण्यात आले आहे. (Election of Bodwad Agricultural Produce Market Committee was adjourned for now jalgaon news)

जिल्ह्यात ११ कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. बोदवड बाजार समितींतर्गत मुक्ताईनगर आणि वरणगाव येथील उपबाजार यांचा अंतर्भाव करण्यात आला आहे.

यातील वरणगाव उपबाजाराला भुसावळ बाजार समितीला जोडण्यात यावे, असा प्रस्ताव आधी सादर करण्यात आला होता. राज्याच्या सहकार खात्याने त्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

या अनुषंगाने बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितींतर्गत असलेल्या वरणगाव उपबाजाराला भुसावळशी जोडण्यात येत असल्याने बोदवड बाजार समितीच्या निवडणूक तूर्तास स्थगित करण्यात येत असल्याचे परिपत्रकात नमूद केले आहे.

बोदवड बाजार समितीतील वरणगाव उपबाजार हा भुसावळला जोडण्यात येणार असून, ही प्रक्रिया जिल्हा उपनिबंधकांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे. त्यानंतरच बोदवड बाजार समितीची निवडणूक होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. सहकार विभागाच्या या निर्णयामुळे निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्यांचा मात्र हिरमोड झाल्याचे दिसून येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Constituency: मनसेनं २००९ मध्ये कोणते मतदारसंघ जिंकले होते? ते आमदार आता कुठे आहेत? राज ठाकरेंना पुन्हा यश येणार?

Latest Marathi News Updates live : shivsena live: शरद पवार उद्यापासून विदर्भ दौऱ्यावर, राज्यात ५५ पेक्षा जास्त सभा घेणार

Tax Evasion: देशात 18,000 बनावट कंपन्या; सरकारची 25,000 कोटी रुपयांची फसवणूक, काय आहे प्रकरण?

शेवटी आईच ती! दिवाळीच्या सुट्ट्या संपवून शूटिंगला परतणाऱ्या सिम्बाला निरोप देताना हमसून रडली माउली, नेटकरी म्हणाले-

Sawantwadi Election : सावंतवाडीत राजकीय 'संशयकल्लोळ'; बंडखोरीमुळे मतदारसंघात पेच, कोण कोणाची मते पळवणार?

SCROLL FOR NEXT