अमळनेर (जि. जळगाव) : तालुक्यातील मांडळ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवडणूक रंजक झाली आहे. एकाच दिवसाच्या सुचनेवर सरपंचपदाची निवड लावण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात असून, सत्तासंघर्ष राज्याच्या राजकारणासारखा दोलायमान झाला आहे. (Election of Sarpanch post of Gram Panchayat disqualified members all confusion in mandal election jalgaon news)
तालुक्यातील मांडळ येथील ग्रामपंचायत सदस्यांना मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र दाखल केले नसल्याने अपात्र करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला होता. मात्र त्या प्रस्तावावर निर्णय होण्यापूर्वीच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मांडळ येथील रिक्त सरपंचपदाची निवड लावण्यात आली.
त्यावर काही सदस्यांनी आक्षेप घेतला, की ग्रामपंचायत सदस्य अपात्र ठरत असताना त्यांना मतदानाचा अधिकार नाही म्हणून निवड स्थगित करावी. उच्च न्यायालयाने सरपंच निवडीला, ऐन काही तासापूर्वी स्थगिती दिली.
त्या दरम्यान एका गटाने तक्रार केल्यावरून जिल्हाधिकाऱ्यांनी हंसराज सुरेश मोरे, विजय सीताराम कोळी व कविता दीपक नंदवे याना अपात्र घोषित केले. त्या गटातर्फे देखील जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली, की कल्पना भाऊराव पाटील व मंगलदास तुळशीराम कांबळे या दोघांनी देखील जातवैधता प्रमाणपत्र वेळेत दाखल केलेले नाही.
हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?
त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या दोघांनाही अपात्र घोषित केले. दरम्यानच्या काळात आधी अपात्र केलेल्या तिघांनी आयुक्तांकडे अपील दाखल करून अपात्रतेवर स्थगिती मिळवली. मात्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ च्या कलम १० -१अ अन्वये आयुक्तांना निर्णय देण्याचे अधिकारच नसल्याचा मुद्दा विरोधी गटाने उपस्थित केला. आयुक्तांना चूक लक्षात आल्याने त्यांनी यावर ६ एप्रिलला सुनावणी ठेवली आहे.
तर दुसरीकडे अपात्र झालेल्या मंगलदास कांबळे व कल्पना पाटील यांनी त्यांचे जातवैधता प्रमाणपत्र जानेवारी २०२२ लाच प्राप्त झाल्याचा पुरावा देऊन ते पत्र जानेवारी २०२२ मध्येच पंचायत समितीकडे दिल्याचा पुरावा दिल्याने पुन्हा सुनावणी घेऊन स्थगिती देण्याची मागणी केली.
जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावर सुनावणी घेऊन निवडणूक आयोगाला विचारणा केली की रिव्हिव्ह किंवा रिकॉल करण्याचे अधिकार आहेत का? आणि निवडणूक आयोगाचे मार्गदर्शन येत नाही, तोपर्यंत त्यांनीच अपात्र केलेल्या आदेशाला तात्पुरती स्थगिती दिली. लागलीच ४ ला ग्रामपंचायत सदस्यांना नोटीस देऊन ५ ला सरपंचपदाची निवड जाहीर केल्याने सदस्यांची चांगलीच धावपळ सुरू झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.