जळगाव

महावितरणकडून लूट सुरूच; छुप्या करांमुळे दुप्पट वीजबिलाचा ‘शॉक’  ​

सचिन जोशी

जळगाव : लॉकडाउन काळात अनेकांचा रोजगार गेलेला असताना महावितरणने विजेचे दर तर वाढविलेच, शिवाय अवाजवी बिले देत ग्राहकांना ‘शॉक’ही दिले. त्यातून सावरणे कठीण असताना ग्राहकांना प्रत्येक बिलामागे छुप्या करांमुळे तब्बल दुपटीपेक्षा अधिक बिल अदा करावे लागत असून, त्यामुळे ग्राहकांचे आर्थिक नियोजनही कोलमडले आहे. 

वेगवेगळ्या माध्यमातून ग्राहकांची लूट करणारी यंत्रणा म्हणून सध्या महावितरणची ओळख निर्माण झाली आहे. आकडे टाकून होणारी वीजचोरी, वीज वहनातील गळती याकडे दुर्लक्ष करत नियमित वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांवरच भुर्दंड लादायचा प्रकार महावितरणकडून नेहमीच केला जातो. 

अवाजवी बिलांपासून सुटका नाही 
मार्चपासून कोरोनामुळे लॉकडाउन सुरू झाले. त्यात सर्वच क्षेत्रे प्रभावित होऊन मोठ्या प्रमाणात लोकांचा रोजगार गेला. देशाची अर्थव्यवस्था मोडकळीस आली. अशात महावितरणने एप्रिलपासून ग्राहकांना अव्वाच्या सव्वा बिले पाठविणे सुरू केले. एकीकडे रीडिंग घेतले जात नव्हते, तर दुसरीकडे ‘सरासरी’ बिलाच्या नावाखाली अवाजवी बिले ग्राहकांना पाठविली जात होती. अनेकांना हे ‘शॉक’ बसल्यानंतर ते प्रमाण अनलॉकच्या टप्प्यात काहीसे कमी झाले. मात्र, अजूनही अवाजवी बिलांची मालिका सुरूच आहे. 

वाढीव दराचा ‘शॉक’ 
रोजगार गेल्याने अनेकांची आर्थिक स्थिती बिकट झाली. मात्र, महावितरणने एप्रिलपासून वाढीव दरानुसार वीजबिल पाठविणे सुरू केले. युनिटमागे जवळपास ५० पैशांची वाढ करून या सेवा देणाऱ्या कंपनीने ग्राहकांना ‘शॉक’ दिले. युनिटमागे ही वाढ कमी वाटत असली तरी तरी तब्बल १६ टक्के आहे. 

आवर्जून वाचा- हतनूर जलाशयात जैवविविधतेचा अभ्यास; ३०९ प्रजातींची नोंद 
 

छुप्या करांनी लूट 
परंतु ही वाढ तेवढ्यापुरती मर्यादित नाही. कारण प्रत्येक बिलामागे छुपे कर जवळपास १०० टक्क्यांहून अधिक आहेत. वापर केलेल्या वीज युनिटच्या रकमेपेक्षा या छुप्या करांची रक्कम दुप्पट असून, त्यामुळे ग्राहकांचे कंबरडेच मोडत आहे. ------ 

अशी होते लूट 
छुप्या करांद्वारे ग्राहकांची लूट कशी होते, याचे हे उदाहरण पाहू. ५०० रुपये एकूण बिल आलेल्या ग्राहकाने केवळ ६९ युनिट वीज वापरली. त्यानुसार त्याने वापरलेल्या युनिटची रक्कम केवळ २२८ रुपये ३६ पैसे आहे. मात्र, या रकमेवर स्थिर आकार ११० रुपये, वहन आकार (प्रतियुनिट १ रुपये ४५ पैसे यानुसार) ९५.७० रुपये आणि तब्बल १६ टक्के वीज शुल्क म्हणून ६९.४५ रुपये असे २७२ रुपयांहून अधिक रक्कम या छुप्या करांची आहे. यातील स्थिर आकार, वहन आकार, वीजशुल्क या काय भानगडी आहेत, हे महावितरण यंत्रणेलाच माहीत. 

संपादन- भूषण श्रीखंडे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: '...तर उद्धव येतोच कसा आडवा?', भोंग्यांवरून राज ठाकरेंनी सुनावलं, नेमकं काय म्हणाले?

Biotech IPO : 'ही' बायोटेक कंपनी आणणार 600 कोटीचा आयपीओ,अधिक जाणून घेऊयात...

Fact Check : इस्लामिक झेंडे फडकवत निघालेली बाईक रॅली अकोल्यातील काॅंग्रेस उमेदवाराच्या प्रचाराची नाही, व्हायरल दावा खोटा

ACMC Solar Holding : एसीएमसी सोलर होल्डिंग्सच्या आयपीओकडून गुंतवणुकदारांची निराशा, शेअर्स 13% डिस्काउंटवर लिस्ट...

'मुश्रीफ खूप प्रामाणिक नेता, त्यांना कोणतेही लेबल लावू नका'; शरद पवारांना उद्देशून काय म्हणाले प्रफुल्ल पटेल?

SCROLL FOR NEXT