Jalgaon News : रेडक्रॉस सोसायटीचा कार्यविस्तार करून ग्रामीण भागातही आरोग्य सुविधांवर भर देण्यात येईल. अनेक नवीन उपक्रम राबविणार आहे. त्यासाठी विविध कार्य करण्यासाठी दहा समित्या स्थापन करणार आहे.
मार्च २०२४ अखेर जिल्ह्यात रेडक्रॉसच्या माध्यमातून आरोग्य, रक्ताची सुविधा दिली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा रेडक्रॉसचे अध्यक्ष आयुष प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत दिली. अध्यक्ष विनोद बियाणी, उपाध्यक्ष गनी मेमन, श्री. महाजन आदी उपस्थित होते.
इंडियन रेडक्रॉस सोसायटीतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध सेवा संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना मिळावी, या उद्देशाने विविध समित्यांची स्थापना करण्यात आली. (Emphasis on health facilities in rural areas by expanding work of the Red Cross jalgaon news)
या समित्यांमध्ये जवळजवळ १५० रेडक्रॉसचे सभासद कार्य करणार आहेत. सुरू असलेले उपक्रम, जळगावकरांच्या आवश्यकतेनुसार भविष्यात राबविण्यात येणारे विविध उपक्रम यावर काम करणार आहेत.
रेडक्रॉस रक्त केंद्राचे कार्य अजून सुरळीत चालविण्यासाठी आणि ‘nyat tested व ल्युको रिड्यूस्ड’ अद्ययावत तंत्रज्ञानाचा प्रचार-प्रसार करून नागरिकांना जगातील सर्वाधिक सुरक्षित रक्त मिळण्यासाठी डॉ. धनंजय बोरोले यांच्या नेतृत्वाखाली नेट प्रमोशन समिती, रुग्णांना वेळेवर रक्त व रक्तघटक मिळण्यासाठी अनिल शिरसाळे यांच्या नेतृत्वाखाली डिमांड जनरेशन समिती, रक्तदान प्रसाद करण्यासाठी राजकुमार वाणी यांच्या नेतृत्वाखाली रक्तदान प्रचार-प्रसार समिती, रक्त व घटकाची गुणवत्ता पाहण्यासाठी डॉ. प्रकाश जैन यांच्या नेतृत्वाखाली गुणवत्ता तपासणी समिती अशा समित्या बनविण्यात आल्या असून, रक्त केंद्र अध्यक्ष डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी यांच्या मार्गदर्शनाखाली वा सर्व समित्यांचे कामकाज सुरू राहील.
व्यापक विविध आरोग्य अभियान राबविण्यासाठी डॉ. रितेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली डोळे तपासणी, दंत तपासणी, आदिवासी नागरिकांसाठी विविध आरोग्य अभियान कॅन्सर ओपीडी इत्यादी उपक्रम राबविले जातील. ज्येष्ठ नागरिकांच्या विविध अडचणी, त्यांचे आरोग्य, कायदेशीर सल्ला, तसेच आवश्यकतेनुसार समुपदेशन करण्यासाठी कार्यकारिणी सदस्य धनंजय जकातदार यांच्या नेतृत्वाखाली सीनिअर सिटीजन आणि समिती बनविण्यात आली आहे.
थॅलेसेमिया ग्रस्तांसाठी रक्त एक्स्पोर्ट करणार
रेडक्रॉसतर्फे ‘nyat tested व ल्युको रिड्यूस्ड’ अद्ययावत तंत्रज्ञानाद्वारे सुरक्षित रक्त दिले जाते. थॅलेसिमिया ग्रस्तांसाठी असे सुरक्षित रक्त एक्स्पोर्ट करण्यावर भर असेल. त्यासाठीची आवश्यक यंत्रणा उभारण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.