जळगाव : महापालिकेच्या कंत्राटी सफाई कामगारांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. या वेळी सफाई कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. (Latest Marathi News)
शहरातील विविध भागांत २० ते २५ वर्षांपासून गल्लीबोळात साफसफाईचे काम करणारे सफाई कामगार आजही कंत्राटी पद्धतीने कामे करीत आहेत. कोरोनाच्या कठीण परिस्थितीतही जळगावकरांची व आपल्या परिवाराची काळजी घेऊन स्वच्छतेची कामे केली. त्यांना महापालिकेने कायमस्वरूपी सफाई कामगार म्हणून सरकारी नोकरीत सामावून घेऊन त्यांना योग्य तो न्याय द्यावा. त्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विमा सुरक्षाकवच देण्यात यावे.
निवृत्तिवेतन, महागाई भत्ता, अशा शासनाच्या योजनांचा फायदा मिळावा. सफाई कामगार महिला, पुरुष सर्व गोरगरीब असून, त्यांचे पगार वेळेवर होत नाहीत. ते वेळेवर व्हावे, जेणेकरून त्यांना आर्थिक परिस्थितीचा फटका बसू नये, या मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटातर्फे बुधवारी (ता. २७) महानगराध्यक्ष अडकमोल यांच्या नेतृत्वाखाली लोकशाही मार्गाने निदर्शने करण्यात आली. मिलिंद सोनवणे, भास्कर वाघ, नितीन नन्नवरे, शंकर सोनवणे, दगडू अहिरे, आकाश वाघ, चंदू बागूल, कैलास सोनवणे, नितीन पवार, प्रताप बनसोडे, किरण अडकमोल, संदीप तायडे, नरेंद्र मोरे, मनीषा बाविस्कर, आशा लोंढे, चिंधाबाई वाघ, शोभाबाई गायकवाड, अलकाबाई नन्नवरे, इंदूबाई पानपाटील आदींनी आंदेालनात सहभाग घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.