Jalgaon municipal commissioner Vidya Gaikwad latest news esakal
जळगाव

Jalgaon News : फुले मार्केटच्या अतिक्रमणाला आता रात्रीही दणका; आयुक्त डॉ. विद्या गायकवाड झाल्या ‘कडकलक्ष्मी’

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शहरातील महात्मा फुले मार्केटचे अतिक्रमण पूर्णपणे काढण्यासाठी आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी कडक भूमिका घेतली आहे.

आता सायंकाळी सहानंतरही अतिक्रमण विभागाचे पथक तैनात राहणार आहे. रात्री तब्बल आठपर्यंत कोणतेही अतिक्रमण होऊ देऊ नये, असे आदेश त्यांनी अतिक्रमण निर्मूलन विभागाला दिले आहेत.

शहरातील महात्मा फुले मार्केटमधील अतिक्रमण नागरिक, व्यापारी व महापालिकेची डोकेदुखी ठरली आहे. रस्त्यावर होणाऱ्या अतिक्रमणामुळे सर्वसामान्य माणसाला चालणेही कठीण झाले होते. त्या ठिकाणी महिलांनाही त्रास सहन करावा लागत होता.(encroachment of Phule Market now even at night Commissioner Dr. Vidya Gaikwad are strict Team deployed till 8 pm Jalgaon News)

त्यामुळे महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाला अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले होते. गेल्या १५ दिवसांपासून महापालिकेने फुले मार्केटच्या अतिक्रमणाविरोधात अत्यंत कडक भूमिका घेतली होती.

अतिक्रमणास आळा

महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने फुले मार्केट, सेंट्रल फुले मार्केटमधील अतिक्रमण पूर्णपणे हटविले होते. गाड्याही जप्त केल्या होत्या. दंड आकारणी करून त्या गाड्या परत दिल्या आहेत. अतिक्रमण हटविल्यामुळे त्या ठिकाणी नागरिकांना चालण्यासही मोकळी जागा झाली होती. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत होते.

सायंकाळी अतिक्रमण ‘जैसे थे’

फुले मार्केटमध्ये महापालिका अतिक्रमण निर्मूलन पथकाचे कर्मचारी दिवसा ठिय्या मारून होते. त्यामुळे कारवाईच्या भितीने अतिक्रमणधारक येत नव्हते. मात्र, सायंकाळी पाचला अतिक्रमण निर्मूलन विभागाचे पथक गेल्यानंतर त्या ठिकाणी अतिक्रमणधारकांची जत्राच भरत होती. अतिक्रमणधारक पुन्हा आपली दुकाने ‘जैसे थे’ लावत होते. सायंकाळी ग्राहकांची गर्दी होते. त्याच वेळी अतिक्रमणधारक दुकाने लावत असल्यामुळे ग्राहकांना त्रास सहन करावा लागत होता. रात्रीही कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी होती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

आयुक्तांची पाहणी अन्‌ कडक भूमिका

आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी सोमवारी (ता. १९) सकाळी अकराच्या सुमारास फुले मार्केट व सेंट्रल फुले मार्केट परिसरातील अतिक्रमण निर्मूलनाची अचानक पाहणी केली. त्यांना त्या ठिकाणी कोणतेही अतिक्रमण दिसून आले नाही. त्यांनी त्या ठिकाणी अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधिकारी व व्यापाऱ्यांशीही चर्चा केली.

त्यावेळी अतिक्रमण निर्मूलनाचे पथक गेल्यानंतर सायंकाळी सहानंतर पुन्हा अतिक्रमणधारक येतात, असे सांगण्यात आले. त्यावेळी आयुक्तांनी तातडीने सायंकाळी सहानंतर अतिक्रमण निर्मूलन विभागाचे पथक तैनात ठेवण्याचे आदेश दिले.

रात्री आठपर्यंत फुले मार्केटमध्ये पथक तैनात राहील, याची अमलंबजावणी सोमवारपासून करण्याचे आदेशही त्यांनी दिले. त्यामुळे सोमवारी सायंकाळी पाचनंतर अतिक्रमण निर्मूलन विभागाचे कर्मचारी फुले मार्केटमध्ये तैनात होते. त्यामुळे सायंकाळी सहानंतर होणाऱ्या अतिक्रमणालाही आता ‘दणका’ बसला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT