Coarse grains Coarse grains
जळगाव

जळगाव : जानेवारी अखेरपर्यंत होणार भरडधान्य खरेदी

आतापर्यंत तीन हजार क्विंटल ज्वारीची खरेदी

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शेतमालास योग्य दर मिळावा, यासाठी शासनस्तरावरून दर वर्षी निश्‍चित केलेल्या भरडधान्य खरेदी केंद्रांवरून शेतमालाची खरेदी केली जाते. भरडधान्य खरेदी योजनेंतर्गत या वर्षी सप्टेंबरमध्येच ऑनलाइन नोंदणी सुरू करण्यात आली होती. या योजनेंतर्गत खरीप हंगामातील ऑनलाइन नोंदणी( Online registration )केलेल्या भरडधान्य शेतमालाची खरेदी डिसेंबरच्या तिसऱ्या सप्ताहात सुरू झाली आहे. शासनस्तरावरून होणारी भरडधान्याची खरेदी आगामी वर्षात ३१ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे.

यंदा सप्टेंबर-ऑक्टोबरदरम्यान अतिवृष्टीने ज्वारी, बाजरी वा मका आदी धान्य काढणीचा हंगाम लांबणीवर पडला होता. त्यामुळे शासनाच्या भरडधान्य खरेदी योजनेंतर्गत ज्वारी, बाजरी, मका या भरडधान्याची खरेदीसाठी १५ सप्टेंबर, १५ व ३१ ऑक्टोबर अशी वेळोवेळी ऑनलाइन नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली होती. या नोंदणीअंतर्गत जिल्ह्यात ३१ ऑक्टोबरअखेर ज्वारी तीन हजार ८०७, मका एक हजार ५८६, बाजरी ५२ अशा शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. शासनाच्या आवाहनानुसार ३१ ऑक्टोबरदरम्यान सर्वांत जास्त ज्वारी खरेदीसाठी तीन हजार ८०७ नोंदणी झाली आहे.

पाच केंद्रांवर खरेदी

शासनाच्या भरडधान्य खरेदी योजनेंतर्गत १७ केंद्रांपैकी पाच केंद्रांवर ऑनलाइन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाची खरेदी केली जात आहे. यात भडगाव, धरणगाव, पारोळा, अमळनेर आणि भुसावळ अशा पाच भरडधान्य खरेदी केंद्रांवर आतापर्यंत ऑनलाइन नोंदणी केलेल्या १६९ शेतकऱ्यांकडील तीन हजार ४५७ क्विंटल ज्वारी, तर ३८ शेतकऱ्यांकडील ८२७ क्विंटल मका उत्पादनाची खरेदी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी चांगल्या प्रतीचा माल विक्रीसाठी आणावा, अतिवृष्टीमुळे डिसकलर झालेले उत्पादन विक्रीसाठी आणू नये, असे आवाहन जिल्हा विपणन अधिकारी गजानन मगरे यांनी केले आहे.

भरडधान्य खरेदी योजनेंतर्गत दर असे

  • ज्वारी- दोन हजार ७३८ क्विंटल

  • बाजरी- दोन हजार २५०

  • मका- एक हजार ८७०

  • मूग- सात हजार २७५

  • उडीद- सहा हजार ३००

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tingre: शरद पवार ईडीला घाबरले नाहीत, तुमच्या नोटिशीला काय घाबरणार! सुप्रिया सुळेंचा टिंगरेंना टोला

DY Chandrachud: सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांचा कार्यकाळ अखेर संपला! ‘या’ महत्वाच्या खटल्यांवर दिले निर्णय

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर....

Vadgaon Sheri News : पोर्शे अपघात प्रकरणी टिंगरेंनी दिली शरद पवार यांना नोटीस - सुप्रिया सुळे

Sakal Natya Mahotsav 2024 : संकर्षण कऱ्हाडे यांच्या उत्तमोत्तम नाटकांची रसिकांना मेजवानी १५ ते १७ नोव्हेंबरला

SCROLL FOR NEXT