crime news  esakal
जळगाव

Jalgaon : अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला लव जिहादच्या संशयावरून मारहाण

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : अभियांत्रिकी महाविद्यालयातील तरुण-तरूणी शिरसोली रोडवरील हॉटेलमध्ये मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आले असताना पूर्वाश्रमीच्या शिवसेना महिला कार्यकर्त्या तथा सद्य:स्थितीत शिंदे गटाच्या समर्थक शोभा चौधरी यांच्यासह काही तरुणांनी हातात लोखंडी रॉड घेत हॉटेलमध्ये धुडगूस घातला होता.(Engineering student beaten up on suspicion of love jihad jalgaon latest news)

वाढदिवस साजरा होत असताना शोएब नासीर पठाण या तरुणाला रस्त्यावर काढून बेदम मारहाण झाली होती. याप्रकरणी संबंधित तरुणीने तक्रार दिल्यावरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात मारहाण करणाऱ्या तरुणांना अटक करून शनिवारी (ता. २४) न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने या तरुणांना पोलिस कोठडीत रवाना केले आहे.

जळगाव शहरातील ख्यातनाम अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणारे तरुण-तरुणी त्यांच्या वर्ग मैत्रिणींचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मोहाडी रस्त्यावरील एका आलिशान हॉटेलात जमले होते. गुरुवारी रात्री आठ वाजता वाढदिवसाचा केक कापून झाल्यावर हे तरुण आनंद साजरा करत असतानाच हॉटेलात रुमाल बांधलेले चार ते पाच तरुण व स्कार्फ बांधलेल्या तीन ते चार तरुणींना घेऊन शोभा चौधरी आत शिरल्या त्यांनी तरुण-तरुणींना त्यांचे ओळखपत्र मागितले.

यानंतर मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेला शोएब पठाण याला लव्हजिहादच्या संशयावरून आलेल्या टोळीने बेदम मारहाण केली होती. संबंधित तरुणीने या प्रकरणी पुढे येऊन मारहाण करत हल्ला करणाऱ्याविरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याने शोभा चौधरींसह आठ ते दहा तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी स्वतः लक्ष घातल्याने या प्रकरणात अटकसत्र राबवण्यात आले.

अटकेतील सहा संशयितांना कोठडी

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर मारहाण करणाऱ्या हरीश चौधरी, अतुल पाटील, निवृत्ती पाटील, भावेश वारुळे, मोहित पाटील, नीलेश माळी अशा सहा संशयितांना ताब्यात घेत कालच (ता. २३) अटक केली. अटकेतील संशयितांना उपनिरीक्षक गोपाळ देशमुख यांनी आज न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने सर्व संशयितांना दोन दिवसांच्या पोलिस कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले असून. या प्रकरणातील प्रमुख संशयित शोभा चौधरी अद्याप पोलिसांना मिळून आलेल्या नसून त्या आजारी असल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election : सट्टाबाजारामध्ये महायुती ‘फेव्हरिट’!महाआघाडीला १ रुपयाला २ रुपये १५ पैसे भाव

Nashik Vidhan Sabha Election: ओझरला रात्री साडेदहापर्यंत मतदान; सुरगाणा, त्र्यंबकेश्‍वर व इगतपुरीच्या मतपेट्या मध्यरात्री जमा

IND vs AUS : स्टंपकडे जाणारा चेंडू लाबुशेनने रोखला, सिराज चांगलाच चिडला; कोहलीने तर बेल्सच उडवल्या..काय हा प्रकार

K.K. Muhammed : ‘ते बारा स्तंभ’ राममंदिराचे अवशेष...पुरातत्त्वविद के.के. मोहम्मद यांची पद्म फेस्टिव्हलमध्ये माहिती

Sanjay Raut: ...नाहीतर भाजप घाईघाईत गौतम अदानींना मुख्यमंत्री बनवेल, मविआच्या नेत्याचा खोचक टोला, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT