engineers day Principal Dr G K Patnaik guidance Opportunities in Cyber ​​Security with AI Robotics Drones jalgaon news 
जळगाव

Engineers Day 2023 : एआय, रोबोटिक्स, ड्रोनसह सायबर सेक्युरिटीजमध्ये संधी : प्राचार्य डॉ. जी. के. पटनाईक

देविदास वाणी

Engineers Day 2023 : आजचे युग माहिती तंत्रज्ञानाचे आहे. यामुळे अभियंत्यांना अनेक क्षेत्रात काम करण्याची संधी आहे. अर्टिफिशिअल इन्टीलिजन्स, रोबोटिक्स, ड्रोन टेकनॉलॉजी, फाईव्ह-जी टेकनॉलॉजी, सायबर सेक्युरिटीज, ब्लॉक चेन या क्षेत्रांत अभियंत्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध असल्याची माहिती येथील एस. एस. बी. टी. कॉलेजचे प्राचार्य डॉ. जी. के. पटनाईक यांनी ‘सकाळ’ला दिली.

शुक्रवारी (ता. १५) साजरा होत असलेल्या अभियंता दिनाच्या पार्श्‍वभूमीवर ते बोलत होते. प्राचार्य डॉ. पटनाईक म्हणाले की, जो सामाजिक प्रश्‍न सोडवितो तो चांगला अभियंता असतो. (engineers day Principal Dr G K Patnaik guidance Opportunities in Cyber ​​Security with AI Robotics Drones jalgaon news)

संगणक जे काम करू शकत नाही, जे प्रश्‍न सोडवत नाही ते सोडविण्यासाठी, संगणकाला अशक्य काम करण्यासाठी अभियंत्यांनी पुढे आले पाहिजे.

अभियांत्रिकीच्या नवीन अभ्यासक्रमांविषयी पालक अनभिज्ञ आहेत. त्यांना त्या गोष्टी माहिती करून घ्याव्या लागतील. कॉलेजेसमध्ये जॉब प्लेसमेंट कॅम्प होतात, चांगल्या प्रयोगशाळा आहेत. नवीन अभ्यासक्रम लागू करताना, विद्यार्थी शिकत असताना त्याला प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देणाऱ्या कंपन्या जळगावला कमी आहेत.

सामंजस्य करार गरजेचा

इंजिनीअरिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जॉब प्लेसमेंट, लर्निंग विथ प्रॅक्टिकलसाठी इंजिनीअरिंग कॉलेजेस व अनेक कंपन्या यांच्यामध्ये सामंजस्य करार होणे गरजेचे आहे. असे मतही त्यांनी या वेळी व्यक्त केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

येथे सुरू व्हावेत स्टार्टअप उद्योग

जळगावमध्ये अभियांत्रिकी झालेले बाहेर जिल्ह्यात, राज्यात, देशात जाऊन आपले ज्ञान देतात. नोकरी करतात, उद्योग उभारतात. जळगावमधील हे कौशल्य बाहेर जाऊ द्यायचे नसेल, तर जळगावमध्ये उद्योग येणे गरजेचे आहे. स्टार्टअप उद्योग, इनक्युबेशन सेन्टर सुरु करण्यासाठी त्यांना सुविधा देणे, फंडिंग करणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.

प्राचार्यांविषयी...

प्राचार्य डॉ. पटनाईक यांनी आतापर्यंत दोन हजार अभियंते घडविले आहेत. त्यांना ३३ वर्षांचा अभियांत्रिकी क्षेत्रातील अनुभव आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली २ विद्यार्थ्यांनी पीएच. डी. घेतली असून, आणखी पाच विद्यार्थी पीएच. डी. घेत आहेत. त्यांचे अभियंता विद्यार्थी टी. सी. एस., विप्रो, रिलायन्स, इन्फॉसीस आदी मोठ्या कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT