Jalgaon News : शहरातील जुने जळगाव कोळी पेठेत महिला सकाळी देवपूजेसाठी मंदिरात गेली असताना घराला लागलेल्या आगीत संपुर्ण घर खाक झाले. आगीच्या भक्षस्थानी असताना मुलास जाग आल्याने त्याने स्वतःचा जीव वाचवून मदतीसाठी आरडा ओरड करून आग विझविण्याचा प्रयत्न केला.
घटनास्थळावर नुकसानग्रस्त घरातील रहिवासी, शीतल कडू मराठे (वय ४०) यांनी दिलेल्या माहिती नुसार, शहरातील जुने जळगाव कोल्हेवाडा जवळील कोळी पेठेत शितल या मुलगा हेमंत सोबत वास्तव्याला आहे. (entire house was gutted in house fire in old Jalgaon Koli Peth of city news)
आज सकाळी आठ वाजेपुर्वी शितल मराठे या देव पुजेसाठी मंदिरात गेल्या होत्या. घरात मुलगा हेमंत झोपलेला असतांना अचानक त्याला श्वात्सोश्वास घेण्यास त्रास होवुन धुराचा वास आल्याने तो झोपेतून उठला.
तेव्हा घरातील फ्रिज जवळून आगीचे लोट उठत होते. तसाच हेमंतने खालच्या मजल्यावरील आजी व मामा यांना मदतीसाठी आरोळ्या मारत बोलावले.
तोपर्यंत संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले घरातून धुराचे लोट उठत असल्याने परिसरातील तरुणांनी मदतीला धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.
मात्र, संपूर्ण घर जळू लागल्याने अग्निशामक दलास पाचारण करण्यात आले.या आगीत घरातील धान्य, कपडे, अंथरुण पांघरुणासह संपुर्ण साहित्य जळून खाक झाले असून शितल मराठे मंदिरातून परतल्यावर हे दृष्य पाहून त्यांनी एकच आक्रोश केला.
घटनेची माहिती कळाल्यावर शनिपेठ पोलिस ठाण्याचे कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. तलाठी राहुल सोनवणे, कोतवाल सुखदेव तायडे यांनी तत्काळ घटनास्थळ गाठत आगीचा पंचनामा केला असून झालेल्या नुकसानाची सखोल माहिती घेतली. शॉटसर्कीटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.
थोडक्यात वाचला जीव
शीतल मराठे पती पासून विभक्त असून गेल्या काही वर्षांपासून मुलगा हेमंतला घेवुन माहेरी राहण्यास आल्या आहेत. तो, शिक्षणासह कुटुंबाला हातभारही लावतो.आज सकाळी घराला आग लागली तेव्हा हेंमत एकटाच घरात झोपलेला होता.
वेळीच त्याला जाग आली अन् तो उठून आग विझविण्याचा प्रयत्न करू लागला. थोडा जरी उशीर झाला असता तर मोठा अनर्थ घडला असता असेही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.