जळगाव : विनापरवानगी निष्काळजीपणे गर्भपात केल्याने अतिरिक्त रक्तस्त्राव होऊन ताडे (ता. एरंडोल) येथील विवाहितेचा मृत्यू झाला होता. बेकायदेशीर गर्भपात करणाऱ्या महिला डॉक्टरला बुधवारी (ता. २५) दुपारी दोनला जळगाव जिल्हा सत्र न्यायालयाने पाच वर्षे सश्रम कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावली. (Erandol doctor rigorous imprisonment in illegal abortion case jalgaon crime news)
एरंडोलमधील मारवाडी गल्लीतील डॉ. सुरेखा श्यामलाल तोतला यांच्याडे गर्भपात करण्याचा परवाना नसताना त्यांनी ताडे येथील कुसुमबाई बाळासाहेब मराठे यांचा बेकायदेशीर गर्भपात केला होता.
नंतर रक्तस्त्राव झाल्याने २२ जून २०१२ ला महिलेलचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी एरंडोलचे तत्कालीन पोलिस निरीक्षक मोहन बनकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून डॉ. सुरेखा तोतला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. पोलिस निरीक्षक बनकर यांनी गुन्ह्याचा तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?
या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. वाय. लाडेकर, न्यायाधीश डी. एस. देशपांडे व जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. सापटणेकर यांच्यासमोर झाली. सरकार पक्षाकडून सहाय्यक सरकारी वकील प्रदीप महाजन यांनी प्रभावी युक्तिवाद केला.
दोषारोप सिद्ध
खटल्यात डॉ. संग्राम पाटील, आत्माराम मराठे, अशोक काकडे, तत्कालीन तहसीलदार इंदिरा चौधरी, मृताची जेठानी कल्पनाबाई पाटील, पती बाळासाहेब पाटील, शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांसह तपासधिकाऱ्यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. पुराव्यांच्या आधारे डॅा. सुरेखा तोतला यांना विविध कलमान्वये पाच वर्षे सश्रम कारावास ठोठावण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.