Jalgaon News : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ईएसआयई) वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत जळगाव एमआयडीसीला भेट देऊन ईएसआयसी रुग्णालयासाठी योग्य जागा शोधून काढली आहे.
अजिंठा रोडवरील मारोती शोरूम मागील परिसरात ही जागा आहे. ही जागा कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या रुग्णालयासाठी निश्चीत करण्यात आली. (ESIC Hospital will be built in premises behind Maruti Showroom jalgaon news)
या वेळी प्रांताधिकारी महेश सुधळकर, तहसिलदार नामदेव पाटील, एमआयडीसीचे अधिकारी वासूदेव सपकाळे, कर्मचारी राज्य विमा महामंडळाचे दिल्लीतील अधिकारी उपस्थित होते.
झाडांची अडचण
‘एमआयडीसी’ही जागा कर्मचारी राज्य विमा महामंडळाला देण्यात येणार आहे. जागेवर ओपन स्पेस, अमेनिटी स्पेसला एकाच ठिकाणावरून एंट्री आहे. त्यामुळे ही स्पेस अदलाबदला करण्यात येणार आहे.
त्याबाबत एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे. याठिकाणी अनेक वर्ष जूनी नानाविध प्रकारची झाडे असल्याने ती तोडावी लागतील. त्यासाठी वनविभागाला कळवून परवानगी घेण्यात येईल.
काही विजेचे पोल आहेत. त्यासाठीचा खर्चही करावा लागणार आहे. यासाठी संबंधित विभागाला कळवून ती कामे लवकर कशी पूर्ण होतील, याकडे लक्ष दिले जाईल. ईएसआयसी रुग्णालयाची पायाभरणी लवकर कशी होइल यासाठी प्रयत्न केले जातील अशी मााहिती जिल्हाधिकारी प्रसाद यांनी दिली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.