District Collector Abhijeet Raut esakal
जळगाव

जळगाव : नार्को कोऑर्डिनेशन सेंटरची जिल्हास्तरीय समिती स्थापन

देवीदास वाणी

जळगाव : जिल्ह्यात अमलीपदार्थ तस्करी विरोधी धोरणात्मक (Anti-drug trafficking policy) बाबींमध्ये समन्वय राखणे, वाढत्या अमली पदार्थाच्या वापरावर आळा घालणे, अमली पदार्थाबाबतची समस्या प्रभावीपणे हाताळण्यासाठी जिल्हास्तरीय ‘एनसीओआरडी’ (नार्को कोऑर्डिनेशन सेंटर) (NARCO Coordination Centre) समिती स्थापन करण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या आदेशानुसार ही समिती स्थापन करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत (District Collector Abhijeet Raut) यांनी दिली. (Establishment of district level committee of Narco Coordination Center Jalgaon New)

ही समिती अमली पदार्थांच्या तस्करीच्या नवीन पध्दतीबाबतची माहिती गुप्तचर संस्था, यंत्रणेमार्फत प्राप्त करतील, जिल्ह्यात गांजा किंवा तत्सम अमली पदार्थाच्या बेकायदेशीर लागवडीवर लक्ष ठेवतील, जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या इतर राज्यात अमली पदार्थांच्या सुरू असलेल्या प्रकरणावर लक्ष ठेवतील, शाळा, महाविद्यालयात अमली पदार्थांच्या गैरवापराबाबत जागरूकता वाढविण्यासाठी जनजागृती करणे, जिल्ह्यातील व्यसनमुक्ती केंद्रे व पुनर्वसन केंद्राचे पर्यवेक्षण करणे. वरील समितीची दर महिन्याला एक बैठक होईल

अशी असेल समिती..

अध्यक्ष- जिल्हाधिकारी अभिजित राऊत, सदस्य सचिव पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, सदस्य जिल्हा आरोग्य अधिकारी, सहाय्यक आयुक्त वस्तू व सेवा कर विभाग, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सर्व उपविभागीय दंडाधिकारी, औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्काचे अधीक्षक, एनसीबीचे जिल्हा प्रतिनिधी, जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT