Crime esakal
जळगाव

Jalgaon: ‘थर्टी फर्स्ट’च्या पूर्वसंध्येलाच मद्यधुंद कारचालकाचा धिंगाणा! पोलिसांचे बॅरीकेटस्‌ तोडून कारची वाहनांना धडक

एका दारुड्याने सुसाट वेगात कार चालवत पोलिसांचे तपासणी बॅरीकेटस्‌ तोडत वाहनांना धडक दिल्याची घटना जिल्‍हाधिकारी कार्यालय ते आकाशवाणी चौकदरम्यान घडली.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : ‘थर्टी फर्स्ट’ च्या पार्श्वभूमीवर पोलिस दलाने एक दिवस अगोदरच शहरात बॅरीकेटींग लावून वाहन तपासणी सुरु केली असून आदल्या रात्रीच एका दारुड्याने सुसाट वेगात कार चालवत पोलिसांचे तपासणी बॅरीकेटस्‌ तोडत वाहनांना धडक दिल्याची घटना जिल्‍हाधिकारी कार्यालय ते आकाशवाणी चौकदरम्यान घडली.

कार चालक प्रेमराज सुभाषराव वाघ (वय ३६, रा. दहिवद ता. चाळीसगाव) याच्याविरुद्ध जिल्‍हापेठ पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. (eve of 31st drunken drivers mischief Cars broke police barricades and collided with vehicles Jalgaon)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेमराज वाघ हा जिल्हाधिकारी कार्यालयात लिपिक म्हणून कार्यरत आहे. शनिवारी (ता.३०) रात्री तो कारमधून (क्र. एमएच १२, एमएफ ९४८१) स्वातंत्र्य चौकाकडून आकाशवाणीकडे जात होता.

पोलिसांतर्फे बॅरीकेटींग करून वाहन तपासणी सुरु होती. पोलिस अधिकारी वाहने तपासत असतानाच लिपिक महाशय प्रेमराव वाघ सुसाट कार दामटत तपासणीला न जुमानता बॅरिकेट्स उडवून सुसाट निघाला.

तपासणीसाठी उभ्या तीन दुचाकी व एका चारचाकी वाहनाला त्याने धडक दिली. यामध्ये वाहतूक शाखेचे कर्मचारी गुणवंत देशमुख, छोटू माधव बोरसे, सिद्धी छोटू बोरसे असे तिघे किरकोळ जखमी झाले.

वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक डी.डी. इंगोले, चंद्रकांत पाटील, योगेश पाटील, गुणवंत देशमुख, भाऊराव घेटे, किरण मराठे, विजय पाटील, पंडित साळी यांनी या कारचालकाचा पाठलाग करून त्याला सर्कल जवळच पकडले. या ठिकाणी संतप्त नागरिक त्याला चोप देणार होते, मात्र वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी त्याला ताब्यात घेऊन जिल्हापेठ पोलिस ठाण्यात नेले.

जमावाकडून मारहाण

कारचालकाने बॅरिकेट्सला उडविल्यानंतर एकामागे एक अशा तीन दुचाकी व एका कारला धडक दिली. ही घटना घडली त्यावेळी सुदैवाने या चौकात गर्दी कमी होती, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.

दारूच्या नशेत तर्र आणि महसुलाचा माज चढलेल्या या कारचालकाने दुचाकी व चारचाकीला धडक दिल्यानंतर न थांबता सुसाट कार पळवून नेली. जखमी पोलिसांना सावरतच एक वाहन त्याच्या मागावर गेले.

नागरिकांच्या मदतीने लाली पान सेंटरच्या पुढे त्याचे वाहन अडवण्यात आले. संतप्त नागरिकांनी त्याला कारमधून ओढत धुधू धुतला. त्याच्या वाहनाची तोडफेाड होणार इतक्यात पोलिस धडकले. जिल्‍हापेठ पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT