Kirankumar Bakale case esakal
जळगाव

Kirankumar Bakale case : बकाले जात्यात...अन्य अधिकारी सुपात!

सकाळ वृत्तसेवा

पोलिस दलात जाहीरपणे नसेलही पण, खासगीत बोलताना अधिकारी गुन्हेगारच काय, पण सहकाऱ्यांशीही कसे बोलतात, याबद्दल न बोललेलंच बरं. या बोलण्यातूनच स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकालेंवर निलंबनाची कुऱ्हाड चालली. आज बकालेंवर कारवाई होऊन ते जात्यात असले तरी त्यांच्यासारखे अनेक अधिकारी सुपात आहेत.

संपर्क, संवादाचे प्रभावी माध्यम म्हणून मोबाईलकडे पाहिले जाते. प्रत्यक्षात त्याचा उपयोग अलीकडच्या काळात तरी विघातक कृत्यांसाठीच अधिक होत असतो. त्यातूनच सायबर क्राईम हा गुन्हेगारीचा नवा प्रकार समोर आला. हे गुन्हे उघडकीस आणणाऱ्या यंत्रणेतील प्रमुखचं मोबाईल नावाच्या यंत्रामुळे ‘उघडे’ पडत असतील तर त्याला काय म्हणावे? खरेतर पोलिस दलच काय, अन्य शासकीय विभागांमध्येही अधिकारी व कर्मचाऱ्यांमधील गटबाजी, जातीयवादाचा विषय लपून राहिलेला नाही. (ex psi kirankumar Bakale suspended case of bad words about maratha community jalgaon Latest Marathi Article)

अगदी मंत्री, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी, विभागांच्या प्रमुखांपासूनच आपल्या भागात, आपल्या हाताखाली ‘आपला’ माणूस हवा यासाठी प्रयत्न होतात.. अगदी पैशांची देवाणघेवाणही होते, हे लपून राहिलेले नाही. पोलिस दलात तर कोणता अधिकारी, कुणी, कुठे व कसा बसवायचा याच्याही ‘बोल्या’ लागतात. मर्जीतील अधिकाऱ्यांसाठी जशी लोकप्रतिनिधी व्यवस्था लावतात, तसे हे अधिकारीही ‘सीट’ पाहून फिल्डिंग लावतात. आणि अशा वर्चस्वातून अनेकदा संघर्षाची स्थिती निर्माण होते.

आपले पद ‘एसपींना समांतर..’ अशा आविर्भावात गुन्हे शाखेचा निरीक्षक नेहमी राहतो. त्यातूनच या पदावरील अधिकाऱ्याची ‘मस्ती’ सुरु असते. बकालेही त्यास अपवाद नव्हते. गुन्हे शाखेत चांगले काम करत असताना हाताखालील सर्वच सहकारी ‘खुश’ असतील, या भ्रमात बकाले होते. त्यातून मुक्ताईनगरच्या गुन्ह्यासंदर्भात त्यांनी मोठी कामगिरी केली.

श्रेयवादाची लढाई याठिकाणीही आडवी आली, आणि त्याचीच संधी साधत बकालेंच्याच हाताखालच्या सहकाऱ्यानं त्यांना उचकावले.. व्हायरल झालेल्या ‘त्या’ क्लीपमध्ये हे स्पष्टच समजते. बकाले भावनेच्या भरात काहीही बरळले आणि त्याचा परिणाम सर्वांसमोर आहे. दुसरीकडे जळगाव जिल्ह्याच्या पोलिस दलातील अधिकारी- कर्मचाऱ्यांमध्ये एकमेकांकडे जातीय दृष्टीकोनातून पाहण्याचे प्रकार तर सुरु झालेच;

शिवाय, परस्पर विश्‍वासार्हताही धोक्यात आली. गुन्हेगारांवर वचक ठेवण्याचे कर्तव्य असलेल्या पोलिसांवरच वचक ठेवण्याची गरज यानिमित्ताने निर्माण झाली. एक बहुसंख्य समाज पेटून उठत असताना पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी ज्या संयमाने हे प्रकरण हाताळले, त्याला तोड नाही. कुठेही बकालेंनी केलेल्या कृत्याला पाठिशी न घालता त्यांनी अपेक्षेनुसार व त्यांच्याकडे असलेल्या अधिकाराचा वापर करत त्वरित नियंत्रण कक्षात त्यांची बदली केली.

शिफारसीनुसार अहवाल पाठवून बकालेंवर वरिष्ठांकडून निलंबनाची कारवाई करवून घेतली. दुसरीकडे क्लीप व्हायरल करणाऱ्या कर्मचाऱ्याने विभागाचे प्रमुख म्हणून अधीक्षकांकडे ही क्लीप द्यायला हवी होती, त्या कर्तव्यात तो चुकला व त्यासही कारवाईला सामोरे जावे लागले.

प्रशासकीय सेवेत, सामाजिक, राजकीय जीवनात काम करताना अधिकारी, कर्मचारीच नव्हे तर अगदी राजकीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनीही बोलण्यावर जसा संयम ठेवला पाहिजे, तसे वागण्याबाबतही स्वत:ची आचारसंहिता घालून घ्यायला हवी. अन्यथा.. बकालेंनंतर आपलाही नंबर लागू शकतो.. याची जाणीव ठेवलेली बरी.

‘स्मार्ट’ फोन ‘स्मार्ट’ली वापरा

आज पोलिस दलात अशा स्वरूपाचे प्रकरण घडले. आज ना उद्या ते कुठल्याही विभागात घडू शकते. आजच्या घडीला प्रत्येकाचा मोबाईल ‘स्मार्ट’ आहे. त्यातून फोटो निघतो, व्हीडीओ बनतो, रेकॉर्डिंग होते.. आणि हे सर्व क्षणात जगभरात पोचूही शकते. त्यामुळे ‘स्मार्ट’ फोन वापरताना तो खूप ‘स्मार्ट’ली वापरायला हवा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Govt of India: भारत सरकारने विकिपीडियाला बजावली नोटीस, केला 'हा' गंभीर आरोप

IPL Auction 2025: CSK vs MI यांच्यात पाच खेळाडूंसाठी रंगणार वॉर! दोन्ही संघ मागे नाही हटणार

Share Market Closing: शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक! सेन्सेक्स 700 अंकांनी वाढला; निफ्टी 24,200च्या जवळ

CJI DY Chandrachud : सरकारविरोधात निकाल म्हणजेच न्यायव्यवस्थेचे स्वतंत्र असे नाही; सरन्यायाधीशांचे खडे बोल

Latest Marathi News Updates live : इतरांकडे असलेल्या चांगल्या गोष्टी पंतप्रधानांना दिसत नाहीत- खर्गे

SCROLL FOR NEXT