जळगाव : महापालिकेतर्फे घरपट्टी थकबाकी भरणाऱ्यांना दंड व व्याज दरात सवलत देणारी ‘अभय शास्ती’ योजना (Abhay Yojana) आता ३१ मार्चपर्यंत कायम राहणार आहे. या योजनेमुळे महापालिकेचे तब्बल ३४ कोटी रुपये वसूल झाले आहेत. (Extension of Municipal Corporation Abhay Shasti till March 31 jalgaon news)
महापालिकेने सुरू केलेल्या अभय शास्ती योजनामुळे फेब्रुवारी महिन्यात १९ कोटी आणि १५ मार्चपर्यंत साडेचौदा कोटी, असे एकूण ३३.५० कोटी रुपये वसूल झाले आहेत. ३३.५० कोटी रुपयांमध्ये एकूण सहा कोटी रुपये शास्ती नागरिकांची माफ झाली आहे.
विशेष बाब म्हणजे आजपर्यंत सहा वर्षांवर ज्या मालमत्ताधारकांची थकबाकी होती, त्यांना शास्ती माफीत भरघोस रक्कम माफ झाल्यामुळे नागरिकांचा या योजनेस मोठा प्रतिसाद लाभला.
हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालात तथ्य की ते भारताविरुद्धचे कारस्थान?
नागरिकांच्या वाढत्या प्रतिसादामुळे व कोविड काळात नागरिकांना कर भरणा शक्य झाले नाही, या सर्व बाबींचा विचार करून आयुक्तांनी स्वेच्छाधिकारात निर्णय घेऊन अभय शास्ती योजनेस ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.