जळगाव

Jalgaon Bribe Crime: ‘बीडीओ’सह विस्तार अधिकारी 5 लाखांची लाच घेताना जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Bribe Crime: ग्रामसेवकाच्या सुरू असलेल्या खात्यांतर्गत चौकशीत त्याला दोषमुक्त करून ‘निल’ अहवाल देण्यासाठी गटविकास अधिकारी (बीडीओ) आणि विस्तार अधिकाऱ्याकडून तब्बल पाच लाखांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. संपूर्ण प्रशासन दिवाळी सुटीवर असताना त्यांनी कार्यालयात येऊन लाच स्वीकारली अन्‌ लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले.

जामनेर तालुक्यात कार्यरत ग्रामसेवक १३ मार्च ते १ जुलैदरम्यान उमाळा (ता. जळगाव) येथील अतिरिक्त कार्यभार सांभाळत असताना या कार्यकाळातील कामकाजासंदर्भातील तक्रारीवरून गटविकास अधिकारी (जळगाव पंचायत समिती) यांच्या अखत्यारीत चारसदस्यीय चौकशी समिती गठीत करण्यात आली होती. (Extension officer with Bod caught in bribery of 5 lakhs Jalgaon Bribe Crime)

समितीप्रमुख म्हणून सहाय्यक गटविकास अधिकारी रवींद्र शालिग्राम सपकाळे यांची, तर सदस्य म्हणून विस्तार अधिकारी पद्माकर बुधा अहिरे, शाखा अभियंता विजय संदानशिव, सहाय्यक लेखाधिकारी पंकज बेलदार अशा समिती सदस्यांकडे चौकशी सुरू होती. सोमवारी (ता. ६) पीडित ग्रामसेवकाने आपला लेखी जबाब नोंदवून म्हणणे सादर केले.

त्यानंतर समितीप्रमुख रवींद्र सपकाळे व पद्माकर अहिरे यांची प्रत्यक्ष भेट घेतली असता त्यांनी पीडित ग्रामसेवकाला या चौकशीच्या फेऱ्यातून सुखरूप बाहेर काढून दोषमुक्त असल्याचा अहवाल देण्यासाठी पाच लाखांच्या लाचेची मागणी केली होती. ग्रामसेवकाने या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून आपली कैफियत मांडली.

उपअधीक्षक सुहास देशमुख यांनी स्वतः तक्रारीची खातरजमा केल्यावर त्यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक अमोल वालझाडे, निरीक्षक एन. एन. जाधव, बाळू मराठे, सुनील वानखेडे, राकेश दुसाने, दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, रवींद्र घुगे, शैला धनगर, किशोर महाजन, प्रदीप पोळ, प्रणेश ठाकूर अशांच्या पथकाने जळगाव पंचायत समिती कार्यालयात सापळा रचला.

सुटीच्या दिवशी शाळा

एरवी वर्षभर कामांसाठी ग्रामीण भागातील लोक या कार्यालयात फेऱ्या मारून हैराण असतात. कधी ‘बीडीओ’ नसतात; तर कधी विस्तार अधिकारी भेटत नाहीत म्हणून सामान्यांचे जोडे झिजतात.

अशा परिस्थितीत चक्क गल्लीपासून दिल्लीपर्यंत प्रशासन दिवाळी सुटीवर असताना ‘बीडीओ’ आणि विस्तार अधिकारी कार्यालयात पाच लाखांची लाच घेण्यासाठी जातीने हजर राहिले.

फक्त ५० हजारच ‘असली’

लाचेची रक्कम असलेल्या नोटा दोन लाचखोरांना देण्यापूर्वी त्यांचा रीतसर पंचनामा करण्यात येऊन रसायनयुक्त पावडर लावण्यात आली. एकदम पाच लाखांची रोकड अशक्य असल्याने लाचलुचपत विभागाने केवळ ५० हजारांच्याच खऱ्या नोटा आणि उर्वरित चार लाख ५० हजारांच्या नकली खेळण्यातील नोटांचे बंडल सोबत जोडून तक्रारदाराबरोबर पाठविले. पैसे स्वीकारल्यावर दबा धरून असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने झडप घालत दोघांना अटक केली.

दोन दिवस ‘पोलिस रिमांड’

पाच लाखांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आलेले सहाय्यक गटविकास अधिकारी रवींद्र सपकाळे (वय ४५, रा. वैष्णवी पार्क, निमखेडी) व त्यांचे सहकारी विस्तार अधिकारी पद्माकर अहिरे (५३, रा. यशवंतनगर) अशा दोघांची वैद्यकीय तपासणी करून रीतसर अटक करण्यात आली.

जिल्‍हापेठ पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात दोघांना जिल्‍हा न्यायालयात हजर केले असता न्या. वावरे यांच्या न्यायालयाने दोन दिवस पेालिस कोठडीत रवाना केले. सरकार पक्षातर्फे ॲड. रमाकांत सोनवणे यांनी कामकाज पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT