Water accumulated in the fields due to 'cloud burst' rain and Motorists crossing Jamner road bridge while waiting for the flood water to recede. 
जळगाव

Jalgaon Rain News : बोदवड, पारोळ्यात मुसळधारेने पिके पाण्यात; शेवगेत बैलजोडी पुरात वाहून गेली

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Rain News : गेल्या काही दिवसांपासून ओढ दिलेल्या पावसाने गुरुवारी (ता. २१) रात्री अकरा ते पहाटे चारच्या दरम्यान बोदवड व पारोळा तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात ‘ढगफुटी’सदृश पाऊस झाला. या पावसामुळे शेतशिवारात पाणी साचून कापसासह पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

दरम्यान, शेवगे बुद्रुक (ता. पारोळा) परिसरातील शिवल्या नालास आलेल्या पुरात बैलजोडी वाहून गेल्याने मृत्युमुखी पडली. जामनेर तालुक्यात तोंडापूरसह परिसरात पहाटेपर्यंत सुरू असलेल्या पावसामुळे खडकी नदीला मोठा पूर आला.

पुराचे पाणी जामनेर रस्त्यावरील पुलावर आल्याने सकाळी दहापर्यंत जामनेर ते तोंडापूर वाहतूक बंद होती. (Extensive damage to crops including cotton due to water logging in fields in jalgaon rain news)

पारोळा तालुक्यातील म्हसवे, जोगलखेडे, वडगाव प्र. अ. यासह पारोळा, चोरवड, शेळावे, बहादरपूर, तामसवाडी, सार्वे, बोळे या सात मंडळात जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे कापसाला आलेली बोंडे गळून पडली आहेत तर मे महिन्याच्या झालेली कपाशीची लागवड धोक्यात आली आहे.

दरम्यान, तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष वाल्मीक पाटील, स्वर्गवासी शरद जोशी प्राणी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर पाटील, तालुकाध्यक्ष प्रा. भिकनराव पाटील, महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुनील देवरे यांनी तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, पीकविमा कंपनीने याबाबत तत्काळ दखल घेऊन शेतीचे पंचनामे करावेत. तसेच कृषी विभागाने याबाबत लक्ष देऊन शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी केली आहे.

दरम्यान, तालुक्यातील जोगलखेडे येथील शेतकरी राजू पाटील, नीलेश पाटील, छोटू पाटील, किशोर पाटील यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात पावसामुळे नुकसान झाले असून, पंचनाम्याची मागणी केली आहे.

शेवगेत सर्वाधिक नुकसान

परिसरात मध्यरात्री बारा ते दीड या दरम्यान मुसळधार पाऊस झाल्यामुळे शिवल्या नालास महापूर आला. युवराज निकम यांची घरासमोरील बैलजोडी पुरात वाहून गेल्याने मृत्युमुखी पडली तर दूध उत्पादक सहकारी संस्थेत तीन ते चार फूट पाणी शिरल्यामुळे पंचांसमक्ष कार्यालय उघडण्यात आले.

अंगणवाडीत शालेय पोषण आहाराचे मोजमाप काट्यासह नुकसानीची पाहणी संबंधित अधिकाऱ्यांकडून करण्यात आली. सरपंच भिकुबाई देशमुख, प्रमुख सदस्य व माजी नगराध्यक्ष दयाराम पाटील, उपसरपंच उषाबाई पाटील, ग्रामसेविका नीतल भामरे, शिपाई प्रमोद कोळी, वायरमन काशिनाथ जाधव यांचे समक्ष संबंधित अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांसमक्ष पंचनामे लिहून घेतले.

बोदवडला पिकांचे नुकसान

तालुक्यातील जामठी, लोणवाडी, येवती, रेवती, धोंडखेडा, कुर्हा हरदो अशा अनेक गावांत पुन्हा एकदा ‘ढगफुटी’सदृश पाऊस झाला. लोणवाडी गावात अनेक घरात पाणी शिरले आहे. याचा मोठा फटका स्थानिक रहिवाशांना बसला आहे. लोणवाडीतील २० घरे पाण्याखाली गेली आहेत. यापूर्वी जुलै महिन्यात या परिसरात अशाचप्रकारे अतिवृष्टी होऊन शेतीचे, घरांचे मोठे नुकसान झाले होते.

मध्यरात्री या परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने शेतीचे बांध फुटले असून, शेतात पाणी साचले आहे. घरांमध्ये पाणी शिरल्याने घरातील सामान भिजले आहे. शेतजमीन खरडून पिके वाहून गेली असून, शेतात पाणी साचले असल्याने जे पिके उभे आहेत, ते सुद्धा पिवळे पडून त्यांच्या मुळा सडून खराब होतील, अशी स्थिती आहे.

"अतिपावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांनी विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांक १८००११६५१५ यावर संपर्क करून नुकसानीबाबत माहिती कळवावी. जेणेकरून नुकसानीचा पंचनामे विमा प्रतिनिधी व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने करता येईल. शेतकऱ्यांनी ७२ तासांच्या आत या नुकसानीबाबत विमा कंपनीच्या टोल फ्रीवर किंवा आपले सेवा केंद्रात शेत नुकसानीची तक्रार दाखल करावी." - दत्तात्रेय डमाळे तालुका कृषी अधिकारी, पारोळा

बोदवडला पंचनाम्याचे आदेश

जामठीसह लोणवाडी परिसरात झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार करीत शेतकऱ्यांसह रहिवाशांचे अतोनात नुकसान केले आहे. याचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार मयूर कडसे यांनी दिले आहे.

आमदार पाटील, रोहिणी खडसेंकडून पाहणी

जामठीसह लोणवाडीत झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसाने अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आमदार चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, बाजार समिती संचालक रामदास पाटील व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आबासाहेब पाटील, शिवसेनेचे तालुका उपाध्यक्ष दीपक माळी आदींनी भेटी दिल्या आहेत.

जामनेरच्या खडकी नदीला पूर

तोंडापूरसह परिसरात रात्रीच्या सुमारास नऊपासून पावसाला सुरुवात झाली. रात्रभर चाललेल्या पावसामुळे व रात्रीच्या १ ते ४ वाजेच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. अजिंठा डोंगररांगांमधील नद्यांना पूर आल्याने व तोंडापूर मध्यम प्रकल्प आधीच १०० टक्के भरून ओसाडत असल्याने खडकी नदीला मोठा पूर आला होता.

पुरामुळे तोंडापूर ते जामनेर रस्त्यावरील पुलावर सकाळी दहापर्यंत पाणी वरुन वाहत असल्याने वाहतूक बंद होती. पाणी कमी होइपर्यंत संपर्क तुटला होता. त्यामुळे तोंडापूर येथील आठवडे बाजारात येणाऱ्या व्यापारी व नागरिकांना ढालगाव ते ढालसिंगी या १० किलोमीटरवर फेऱ्याने प्रवास करावा लागला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT