Money Fraud Crime News esakal
जळगाव

Jalgaon Crime News : परताव्याचे आमिष दाखवून दीड कोटीचा गंडा

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : सॉफ्टवेअर एक्सपोर्ट कंपनीच्या मालकाला शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करून रक्कम तीन- चार पट करून देतो, असे आमिष दाखवून सुमारे दीड कोटीत फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

ओंकारनगरातील रहिवासी तथा वनिरा हायटेक सॉफटवेअर एक्सपोर्ट कंपनीचे मालक वासुदेव रामदास महाजन यांनी ऑक्टोबर महिन्यात गुगलवर ‘ग्रॉथ ट्रेड इंडिया डॉट कॉम’ ही वेबसाईट सर्च केली. ही कंपनी शेअर बाजारात गुतंवणूक करण्या संदर्भात मार्गदर्शन व अन्य प्रकारच्या सेवा पुरवीत असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यात महाजन यांनी सर्व प्रकारची माहिती भरली. (Extortion of 1.5 crore by showing lure of refund in share market Jalgaon Crime News)

अशी झाली फसवणूक

नंतर कंपनीकडून आयेशा नामक महिलेचा महाजन यांना फोन आला. त्या महिलेने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासंदर्भात सल्ला दिला. सुरवातीला किरकोळ गुंतवणूक केल्यानंतर त्यांना यात चांगला नफा मिळाला. अशाप्रकारे विश्‍वास संपादन झाल्यानंतर महाजन वेळोवेळी ठराविक रक्कम भरत गेले. याद्वारे त्यांनी तब्बल १ कोटी ४४ लाख २६ हजार ११६ रुपये भरले. मात्र, दिलेल्या वेळेत नफा न मिळाल्याने महाजन यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

पोलिसांत फिर्याद

त्यावर महाजन यांनी गुरुवारी (ता. ८) दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात आयशा (पूर्ण नाव माहीत नाही), विष्णू अग्रवाल, रिचा गुप्ता, अंगदसिंग ऊर्फ अरुण (पूर्ण नाव माहीत नाही) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा : देशाचे नवे पर्यायी चलन ‘डिजिटल रुपी’

कोट्यवधींच्या रकमेचे आमिष

वासुदेव महाजन यांना ग्रॉथ ट्रेड इंडियाचा ३ नोव्हेंबरला मेल आला. त्यानुसार त्यांना साडेसात लाख रुपये गुंतवणूक केल्यास २५ ते ३० दिवसांत ६० लाख रुपयांचा परतावा मिळेल, असे आमिष देण्यात आले. संबंधित कंपनी फक्त काही टक्के रक्कम घेईल, असे त्यात नमूद केले होते. प्रत्यक्षात त्यांनी १ कोटी ४४ लाख २६ हजार ११६ रुपयांची रक्कम ऑनलाईन भरली. २५ नोव्हेंबरला नफ्याची ७ कोटी ६८ लाख ७९ हजार ५१८ रक्कम आणि गुंतवणूक केलेली रक्कम ही २८ नोव्हेंबरला मिळेल, असा मेसेज मेलद्वारे आला. नंतर पुन्हा त्यांना ५ डिसेंबरची तारीख देण्यात आली.

पत्त्याच्या ठिकाणी कंपनीचा पत्ताच नाही

फसवणूक होत असल्याचे लक्षात येत असल्याने महाजन यांनी वेबसाईटवर ग्रॉथ ट्रेड इंडिया सर्च केली. त्यावर कोलकाता आणि नाशिक येथील कंपनीचा पत्ता होता. या पत्त्यावर त्यांनी कंपनीबाबत चौकशी केली असता, या दोन्ही ठिकाणी अशा नावाची कंपनीच नसल्याचे समोर आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT