Eye Infection esakal
जळगाव

Eye Infection : जिल्ह्यात डोळ्यांच्या साथीची लागण; 100 रुग्णांमागे 10 ग्ण साथीचे

सकाळ वृत्तसेवा

Eye Infection : सततचा पाऊस व दूषित पाण्यामुळे कीटाणू संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. सध्या डोळ्यांमध्ये किटाणूंचा संसर्ग होऊन अनेकांना डोळ्यांचे आजार जडले आहेत. बहुतांश सर्वच शाळांमध्ये लहान मुलांना डोळ्यांच्या साथीची लागण झाली आहे.

जिल्हा रुग्णालय व शासकीय रुग्णालयात दर शंभर रुग्णांमागे दहा रुग्ण डोळ्याच्या आजाराचे येत आहेत. नेत्र रुग्णालयातही अशाप्रकारचे रुग्ण वाढले आहेत. (Eye infection in district 10 cases per 100 patients jalgaon)

काही रुग्ण थेट मेडिकलवर जाऊन डोळ्यात टाकायचा मलम घेऊन बाहेर जाणे टाळत आहेत, तर काही जण डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करीत आहेत.

डोळे येणे म्हणजे डोळ्याच्या पांढऱ्या भागाला म्हणजेच कंजंक्टिव्हाला सूज येणे. जिवाणू अथवा विषाणूंच्या संसर्गामुळे होणारा कंजंक्टिव्हायटिसचे संक्रमण एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीस होते.

अचानक डोळ्यांची जळजळ होणे, दुखणे, पाणी व घाण येणे, पापण्या चिकटणे व प्रकाश सहन न होणे, ही डोळे येण्याची लक्षणे आहेत. बहुधा हा आजार साथीच्या स्वरूपात येतो. त्याचे कारण बहुतेक वेळा सूक्ष्मजंतू (जिवाणू-विषाणू) हेच असते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

डोळे आलेल्या व्यक्तीचा रुमाल, चष्मा, आयड्रॉप्स किंवा सौंदर्यप्रसाधनांच्या वापरामुळे इतरांकडे त्याचा प्रसार होतो.

सुरवातीला डोळ्यांमध्ये काही तरी गेल्यासारखे खुपते. त्यानंतर काही तासांतच प्रथम एक व काही तासांत किंवा एक-दोन दिवसांत दुसरा डोळा लाल दिसू लागतो. डोळ्यांतून सुरवातीला पाणी, नंतर चिकट घाण येऊ लागते.

सकाळी उठल्यावर चिकटललेल्या दोन्ही पापण्या पाण्याने धुतल्याखेरीज डोळा उघडत नाही. उजेडाकडे बघवत नाही. या विकाराचा जोर एक ते दोन आठवडे टिकून राहतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : भाजप 100 जागांवर आघाडीवर, सलग तीन निवडणुकांमध्ये केले शतक पार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूर आणि स्नेहा दुबेंमध्ये काट्याची टक्कर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result : महायुती 200 पार; महाविकास आघाडीची मोठी निराशा

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

SCROLL FOR NEXT