Shubham and Divya's wedding photo  esakal
जळगाव

Jalgaon Fraud News : धक्कादायक! लग्नाच्या पहिल्या रात्री बायकोजवळ गेला अन... पायाखालची जमीनच सरकली...!

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : पारंपरिक पद्धतीने नवरी शोधणे यापेक्षा आता वैवाहिक संबंधासाठी शेकडो ऑनलाइन साइट कार्यरत झाल्या आहेत. त्यातून जन्मोजन्मीच्या गाठी बांधल्याचेही उदाहरणे कमी नाहीत. (facebook friend marriage fraud of young man in jalgaon news)

सोशल मीडियावर ओळख अन्‌ तत्काळ विवाह

जळगाव शहरातील कांचननगर चौगुले प्लॉटमधील मूळ रहिवासी शुभम संजय पाटकर (वय २६) खासगी नोकरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. १४ मार्च २०२३ ला शुभम मोबाईलवर खेळत असताना त्याच्या फेसबुक अकाउंटवर दिव्या पाटील या नावाने मुलीची ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ आली.

ती त्याने स्वीकारल्यानंतर दोघांमध्ये विचारांचे आदानप्रदान होऊन अवघ्या १५ दिवसांत दोघांनी लग्नाचा बार उडवून दिला. नवरा मुलगा शुभम पाटकर याच्या वाढदिवसाचा मुहूर्त पाहून परिचितांच्या उपस्थितीत हा विवाह झाला.

‘निकोटेक्स’ने पाडले उघडे

शुभमची आई, मामी जेवणानंतर दिव्याला घेऊन शतपावली करीत असताना, अचानक दिव्या मेडिकलवर गेली. तेथून गोळ्यांचे पाकीट घेऊन आली. ही मुलगी सतत काय चावत असते, म्हणून मुलाच्या आईने नवरीचे गोळ्यांचे पाकीट समजूतदार व्यक्तीला दाखविले. सिगारेट, तंबाखूचे व्यसन असणाऱ्यांना या गोळ्या लागत असल्याचे कळताच सासूबाईने जाब विचारल्यावर दिव्याने चक्क शिवीगाळ केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

...अन्‌ पायाखालची जमीन सरकली

लग्नानंतर नवदांपत्याचे देवदर्शन झाले. सर्व विवाह संस्कार पांरपरिक पद्धतीने झाले. पाटकर कुटुंबाचा आनंद गगनाला भिडला असतानाच अचानक त्यांच्या आनंदावर विरजण पडले. लग्न करून आणलेली व्यक्ती मुलगी नसून ती चक्क तृतीयपंथी असल्याचे समजल्यावर पाटकर कुटुंबीयांना धक्का बसला व त्यांनी मदतीसाठी पोलिस ठाणे व न्यायालयात धाव घेतली. पीडित कुटुंबीयांकडून ॲड. केदार भुसारी यांनी न्यायालयात तक्रार केली.

मधुचंद्रालाच संशयाची ठिणगी

गिरणा पंपिंग रोडवरील मामाच्या घरात नवदांपत्यांसाठी कायम राहण्याची सोय केली. पाटकर कुटुंब आणि नातेवाइकांनी नवदांपत्याच्या मधुचंद्राची जोरदार तयारी केली. खोली सजविली. जोडपे आत गेल्यावर पत्नी म्हणून शुभमने जवळ जाण्याचा प्रयत्न केला असता, दिव्याने मला त्रास होतोय, असे सांगून माणसासारख्या शिव्या देत त्याला खोलीबाहेर काढले.

तृतीयपंथी असताना, मुलगी असल्याची बतावणी करून विवाह करणाऱ्या तृतीयपंथीविरुद्ध प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश बुधवारी (ता. ५) दिले.

असा हा धक्कादायक प्रकार न्यायालयीन निवाड्याने समोर आल्यामुळे खळबळ उडाली असून, सोशल मीडियावर ओळख झाल्यानंतर थेट विवाहाचा निर्णय अंगाशी कसा येऊ शकतो, याबाबत विचार करायला लावणारा हा प्रकार आहे.

वैद्यकीय तपासणीनंतर धक्का

नवीन नवरी असल्याने आणि तिला शारीरिक त्रास होत असल्याचे वारंवार कारण दिले जात असल्याने वैवाहिक सुख मिळत नसताना शुभमने कोणास काही न सांगता शांत राहणे पसंत केले. त्याने आईला नवविवाहितेस रुग्णालयात नेण्यास सांगून आपली शंकाही बोलून दाखवली.

मुलाच्या आईने जवळच महिला डॉक्टरांकडे तिला तपासणीसाठी नेले. डॉक्टरांनी तुमची सून कधीच आई होऊ शकत नाही. कारण ती मुलगी नसून तृतीयपंथी असल्याचे सांगताच मुलाच्या आईसह कुटुंबीयांना जबर धक्का बसला.

गुन्हा दाखल करण्याचे आदेश

घडल्या प्रकाराबाबत शुभम पाटकर व कुटुंबीयांनी पोलिस अधीक्षकांसह रामानंदनगर पोलिसांत लेखी फसवणुकीची तक्रार दिली. त्यानंतर संशयित दिव्याबाबत उपलब्ध पुरावे आणि डॉक्टरांचा वैद्यकीय अहवाल, सोशल मीडियावरील संशयिताच्या गैरवर्तनाचे दस्तऐवज अशांसह न्यायालयात दाद मागितली. प्रथम वर्ग न्यायाधीश आर. वाय. खांडरे यांच्या न्यायालयाने पोलिसांना तपास करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT