Bijan Roy esakal
जळगाव

Jalgaon Crime News : यावल शहरात बोगस डॉक्टरला अटक; दवाखान्यात आढळली औषधी

शहरातील नगरपालिकेच्या व्यापारी संकुलात वैद्यकीय पदवी नसताना वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बोगस डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : शहरातील नगरपालिकेच्या व्यापारी संकुलात वैद्यकीय पदवी नसताना वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बोगस डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बोगस डॉक्टरसंदर्भात गोपनीय माहिती बोगस वैद्यकीय व्यावसायिक शोधणाऱ्या समितीला मिळाली होती. (fake doctor arrested in Yawal city jalgaon crime news)

या समितीने त्या ठिकाणी पंचांसह जाऊन तपासणी केली आणि संबंधिताला पोलिसांच्या स्वाधीन केले व संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावल शहरात अंकलेश्वर- बऱ्हाणपूर राज्य मार्गाला लागून भुसावळ टी पॉइंटजवळ पालिकेचे व्यापारी संकुल आहे.

या व्यापारी संकुलाच्या एका गाळ्यात कुठल्याच प्रकारची वैद्यकीय पदवी नसताना डॉ. बिजन निमचंद रॉय (रा. धनगरवाडा, यावल) हा बंगाली डॉक्टर अवैधरीत्या वैद्यकीय व्यवसाय करताना करीत आहे, अशी माहिती तालुकास्तरीय बोगस वैद्यकीय व्यवसाय शोधणाऱ्या समितीला मिळाली होती.

तेव्हा समिती सदस्य तथा तालुका आरोग्य अधिकारी राजू याकूब तडवी, आरोग्य विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर पाटील, शकील तडवी, अमित तडवी, पंच डॉ. सतीष अस्वार, डॉ. धीरज पाटील यांच्यासोबत पोलिसांची मदत घेऊन या डॉक्टरकडे छापा टाकण्यात आला. तेथे डॉ. बिजन रॉय हा आपल्याकडे कुठल्याच प्रकारची मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाची प्रमाणपत्र व इतर काही पदवी नसताना बोगस पद्धतीने वैद्यकीय व्यवसाय करीत असल्याचे निदर्शनास आले.

त्याच्याकडे ॲलोपॅथी, अँटिबायोटिक्ससह विविध प्रकारची औषधी आढळून आली तर त्या ठिकाणी दहिगाव येथील एक रुग्ण देखील उपचारासाठी आला होता. मागील दोन दिवसांपासून तो ‘मुळव्याध’ वर या ठिकाणी उपचार घेत असल्याचे त्यांनी सांगितले तर या डॉक्टरकडे विविध प्रकारचे वैद्यकीय औषधे देखील अनधिकृतपणे आढळून आले.

तेव्हा संबंधित डॉक्टरविरुद्ध यावल पोलिस ठाण्यात तालुका आरोग्य अधिकारी राजू तडवी यांच्या फिर्यादीवरून वैद्यकीय वैद्यक व्यवसाय अधिनियम १९६१ चे कलम ३३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक साळुंखे तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT