fertilizer esakal
जळगाव

Fake Fertilizer News : 'त्या’ खतामध्ये केवळ ६ टक्के पोटॅश; शेतकऱ्यांच्या जिवाशी खेळ

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : हातेड खुर्द (ता. चोपडा) येथील शेतकरी किशोर आत्माराम पाटील यांनी विकत घेतलेले पोटॅश खत बनावट असल्याबाबत कृषी विभागाकडे तक्रार केली होती. यानुसार कृषी विभागाने सापळा रचत तोंदे (ता. शिरपूर, जि. धुळे) या ठिकाणी छापा टाकला होता. (fake potash fertilizer was found to contain only 6 percent potash as against required 60 percent jalgaon news)

या वेळी ५७ बनावट पोटॅश खताचा बॅग आढळून आल्यात. या बनावट पोटॅश खतात अवघे ६ टक्के पोटॅशचे प्रमाण आढळून आले की जे प्रमाण ६० टक्के पाहिजे, असा अहवाल नाशिक येथील खत नियंत्रण प्रयोगशाळा यांनी दिला आहे.

यावरून शेतकऱ्यांची सर्रास फसवणूक होत असून, बनावट खते विक्री होत असल्याचे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याची सखोल चौकशी करून बनावट खत विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक कार्यवाही व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

हातेड खुर्द (ता. चोपडा) येथील शेतकरी किशोर पाटील यांनी बोगस पोटॅश खत असल्याची खात्री झाल्यानंतर कृषी विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीवरून कृषी सहाय्यक विलास मोरे, तालुका कृषी अधिकारी दीपक साळुंखे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अरुण तायडे, धुळे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक मनोज शिसोदे यांच्या संयुक्त पथकाने सापळा रचत ५७ बॅग बनावट पोटॅश खताच्या ९६ हजार ९०० रुपयांच्या किमतीच्या मुद्देमाल जप्त केला होता.

हा बनावट पोटॅश खताचा नमुना प्रयोगशाळा तपासणीसाठी पाठविला होता. या तपासणीअंती हे खत बनावट तर आहेच, पण त्यातील पोटॅशचे प्रमाण अवघे ६ टक्केच आढळून आले असल्याने शेतकऱ्यांना बोगस बियाणे, बनावट खते विक्रीमध्ये लूट होत असल्याचे दिसून येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT