जळगाव : दिवाळीच्या सणानंतर सोने-चांदीच्या दरात कमालीची अस्थिरता पाहायला मिळत आहे. येथील सराफ बाजारात चांदीच्या दरात गुरुवारी (ता. ३) तब्बल हजार रुपयांची घसरण झाली. चांदीचा आजचा भाव जीएसटीसह प्रतिकिलो ६० हजार रुपये होता.
हीच चांदी बुधवारी (ता. २) ६१ हजारांच्या घरात पोचली होती. दुसरीकडे सोन्यात चारशे रुपयांची घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय भावातील चढ-उतारामुळे दरात अस्थिरता दिसून येत असल्याचे जाणकारांचे मत आहे. (Fall in Price of Silver Gold also declines Fluctuations in international markets Jalgaon News)
धनत्रयोदशीच्या दिवशी सोने ५२ हजार ८०० प्रतितोळा होते. आज तेच सोने ५० हजार २०० प्रतितोळा झाले आहे. आठवडाभरात मोठ्या प्रमाणावर सोन्या-चांदीच्या भावात मोठ्या प्रमाणावर तफावत दिसून येत आहे. गणेशोत्सवानंतर सोने बाजार झळाळू लागला. कमी-अधिक प्रमाणात दरात वाढ, घट होत होती.
चांदी ५४ हजारांपर्यंत खाली आली होती. सोने पन्नास हजारांपर्यंत खाली आले होते. मात्र नवरात्रोत्सवात सोने बाजाराने जी घसरण घेतली ती विजयादशमीपर्यंत व नंतरचे काही दिवस कायम होती. आत तब्बल दहा दिवसांनी सोने ५० हजार २०० रुपये प्रतितोळा आहे. चांदी ६० हजारांवर आहे. सोन्या-चांदीतील गुंतवणूकदारांना ही गुंतवणुकीची संधी असल्याचे अभ्यासक सांगतात. दरम्यान, सोने, चांदीच्या दरात काही अंशी वाढ झाल्याचे दिसून आले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.