Death News esakal
जळगाव

Jalgaon News : दुबार पेरणीचा धसका घेत शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : डोक्यावर कर्जाचा डोंगर, त्यातच महिनाभरापासून पावसाने ओढ दिल्याने दुबार पेरणीचा धसका घेतलेल्या शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.

ही घटना तालुक्यातील शिदवाडी (ता. चाळीसगाव) येथे घडली. या प्रकरणी मेहुणबारे पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (farmer commits suicide due to fear of sowing twice)

शिदवाडी (ता. चाळीसगाव) येथील नेताजी रामदास पाटील (वय ६८) हे शेती व्यवसाय करून कुटुंबासह गुजराण करतात. नेताजी पाटील यांच्यावर शेतीचे तसेच बाहेरील कर्ज होते. त्यातच यंदा पाऊस वेळेवर पडला नाही म्हणून दुबार पेरणी करावी लागल्याने ते चिंतित होते. या विषयी ते सतत चिंता व्यक्त करायचे. गुरुवारी सकाळी नऊला ते गावातीलच लक्ष्मण कोठारे यांच्या शेतात कामाला गेले.

सायंकाळी चारला पाऊस झाल्याने परिसरातील शेतकरी घरी गेले. मात्र नेताजी पाटील हे सायंकाळी घरी परत न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांसह गावकऱ्यांनी त्यांचा शोध घेण्यासाठी कोठारे यांचे शेत गाठले. तेथे विहिरीजवळ नेताजी पाटील यांच्या पायातील बूट आढळून आले. त्यामुळे नेताजी पाटील यांनी विहिरीत उडी मारून जिवाचे बरे-वाईट केल्याची कुटुंबीयाला शंका आली. त्यामुळे कुटुंबीय व गावकरी रात्रभर विहिरीजवळच थांबून होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

शुक्रवार (ता.७) सकाळी शेतातील राखण करणाऱ्या पावरा समाजाच्या मजुरांनी विहिरीत उतरून त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र विहिरीतील पाणी खोल असल्याने व खाली गाळ असल्याने त्यांच्याकडून काहीएक थांगपत्ता लागला नाही. शेवटी उपखेड येथील एका व्यक्तीस बोलावल्यानंतर त्याने विहिरीत उडी घेऊन पाण्यातील गाळातून नेताजी पाटील यांचा मृतदेह बाहेर काढला.

त्यानंतर त्यांचा मृतदेह ग्रामीण रूग्णालय मेहुणबारे येथे नेण्यात आला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन केले. शेतीचे व बाहेरील कर्ज तसेच शेतात कराव्या लागणाऱ्या दुबार पेरणीचा धसका घेऊन नेताजी पाटील यांनी विहिरीत उडी घेऊन जीवन संपवले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संजय नाना पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून मेहुणबारे पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

IND vs AUS: 'मी तुझ्यापेक्षा फास्ट बॉलिंग करतो...', मिचेल स्टार्कची हर्षित राणाविरुद्ध स्लेजिंग; पाहा Video

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

SCROLL FOR NEXT