Farming done by farmer Malhar Kumbhar in modern way. esakal
जळगाव

Ideal Farmer : विविध योजनांमुळे मल्हार कुंभार बनले आदर्श शेतकरी...

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : राज्यातील शेतकरी (Farmer) समृद्ध व्हावा, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्याचा शाश्वत विकास व्हावा, यासाठी शासनातर्फे अनेक लाभदायी योजना राबविल्या जातात. (farmer Malhar Kumbhar earned honor of becoming an ideal farmers by farming in modern ways jalgaon news)

शासकीय योजनांचा लाभ घेऊन चोरवड (ता. पारोळा) येथील युवा शेतकरी मल्हार प्रल्हाद कुंभार यांनी आधुनिक पद्धतीने शेती करत आदर्श शेतकरी होण्याचा मान मिळविला आहे.

कृषी विभागातर्फे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) योजनेंतर्गत त्यांना कृषीपंप, ठिबक, शेततळे आणि त्या माध्यमातून मत्स्यपालन, फळबाग, बांधावर बांबू लागवड, सेंद्रिय गांडूळ खत युनिट, शेतकरी गटाला अवजार बँक, रेशीम उद्योगासाठी तुती लागवड केली आहे.

वीज समस्येवर मात

युवा शेतकरी मल्हार कुंभार यांचे शिक्षण कृषी पदवीपर्यंत झाले आहे. वडिलोपार्जित पारंपरिक पद्धतीऐवजी आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा त्यांनी निर्णय घेत शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेतला. यात अटल सौरपंप योजनेंतर्गत त्यांना पाच एचपी क्षमतेचा सौरपंप मिळाला आणि वारंवार उद्‌भवणाऱ्या विजेच्या समस्येवर त्यांनी मात केली.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालात तथ्य की ते भारताविरुद्धचे कारस्थान?

पोकरा योजनेंतर्गत शेततळे, त्या माध्यमातून मत्स्यपालन सुरू करत दुहेरी उत्पन्न सुरू केले आहे. शेतकऱ्यांचा समूह तयार करून अवजार सेवा केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जमिनीच्या मशागतीसाठी यंत्र अत्यंत माफक दरात पुरविण्याचे काम या माध्यमातून सुरू आहे.

"कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेत शेतीचे योग्य नियोजन केल्यामुळे दरवर्षी चार हेक्टर क्षेत्रात लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. या योजनेबद्दल इतर शेतकऱ्यांनाही मार्गदर्शन केले आहे. आमच्या गावातील अनेक शेतकरी शासनाच्या योजनांचा लाभ घेत असून, त्यांनाही फायदा होत आहे." -मल्हार कुंभार, युवा शेतकरी, चोरवड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सचिन पाटील 13327 मतांनी आघाडीवर

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT