जळगाव

तापी खोऱ्यातील केळीच्या पट्ट्यात हळदीचे विक्रमी उत्पादन  ​

प्रदीप वैद्य

रावेर  : तालुक्यात हळद काढणीला वेग आला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत हेक्टरी १० ते १५ क्विंटल हळदीचे उत्पादन अधिक आले आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. केळीला पर्याय म्हणून हळद पीक केळीच्या तापी खोऱ्या‍त हळदीची वीस, पंचवीस हेक्टरवरून ८०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात लागवड होत आहे. 

तालुक्यात केळीला अनिश्चित भाव, यामुळे या पिकाला पर्याय म्हणून गेल्या दहा, पंधरा वर्षांपासून तालुक्यात अद्रक व हळद पेरणीला शेतकऱ्यांनी सुरवात केली. मात्र, अद्रकचे उत्पादन पहिजे, तसे शेतकऱ्यांना मिळाले नाही. मात्र, हळदीचे उत्पादन बऱ्यापैकी मिळू लागले. ऐनपूर, विटवा, निंबोल कुंभारखेडा, चिनावल भागात हळद लावली जात असे. शेतकऱ्यांनी सांगली, सातारा भागातील हळदीची शेती कशा पद्धतीने करतात, या बाबत अभ्यास दौरा करून हळद लागवडीस प्रारंभ केला. सुरवातीला २० ते ३० हेक्टर क्षेत्रात हळद लागवडीस सुरवात झाली. पोषक वातावरण, पाणी, खतांचे नियोजन या मुळे आज ती तालुक्यात ८०० हेक्टरहून अधिक क्षेत्रात हळदीची पेरणी होत आहे. 

शेतकरी हळदीवर करू लागली प्रक्रिया

सुरवातीला ओली अगर कोरडी हळद सांगली, सातारा बाजारपेठेत शेतकरी घेऊन जात. मात्र, वाहतूक खर्च परवडत नसल्यामुळे काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतात हळद वाळवून प्रक्रिया करून हळद पावडर बनवणे सुरू केले. जसजसे हळदीची लागवड वाढत गेली तसतसे तालुक्यातील हळदीचे व्यापारी ही वाढले. 

या वर्षी विक्रमी उत्पादन 
मागील वर्षी सुरवातीस कमी पाऊस व नंतर परतीची अतिवृष्टी यामुळे शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी १३० ते १४० क्विंटल हळदीचे उत्पादन मिळाले. या वर्षी या पिकास अनुकूल वातावरण, पाऊस यामुळे प्रति हेक्टरी १६० ते १७० क्विंटल म्हणजे १० ते १५ क्विंटल हळदीचे उत्पादन अधिक निघत आहे. मागील वर्षी ७५० ते ८०० रुपये प्रति क्विंटल भाव हळदीस मिळाला होता. या वर्षी सुरवातीस हळदीच्या लोणच्यासाठी एक हजार ते अकराशे प्रति क्विंटल भाव तर सध्या ८०० ते ८५० रुपये प्रति क्विंटल भाव हळदीस मिळत असल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे. 


रावेर बाजार समितीत हळदीचा जाहीर लिलाव सुरू केल्यास शेतकऱ्यांच्या हळदी पिकास चांगला भाव मिळू शकेल. 
- विनोद गिरधर महाजन, 
शेतकरी, उटखेडा (ता. रावेर) 
 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजारात जोरदार तेजी; सेन्सेक्स-निफ्टी अडीच टक्क्यांनी वाढले, आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये तुफान खरेदी

AUS vs IND 1st Test: पहिल्याच दिवशी १७ विकेट्स! भारत-ऑस्ट्रेलियाची फलंदाजी कोलमडली, पण गोलंदाजांनी मैदान गाजवलं

Parkash Ambedkar : सत्तेत सहभागी होण्याबाबत प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केली भूमिका, ते म्हणाले...

Maharashtra Assembly Election : सट्टाबाजारामध्ये महायुती ‘फेव्हरिट’!महाआघाडीला १ रुपयाला २ रुपये १५ पैसे भाव

Latest Maharashtra News Updates : जम्मूमध्ये अतिक्रमणविरोधी मोहीम

SCROLL FOR NEXT