जळगाव : जैन इरिगेशनच्या जैन हिल्सवरील कृषी संशोधन विकास केंद्रावर राज्यभरातील निमंत्रित शेतकऱ्यांसाठी अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले.
यात राज्य व मध्य प्रदेशातील काही जिल्ह्यांमधील हजारो शेतकरी जैन हिल्सच्या कृषी संशोधन आणि प्रात्याक्षिक परीक्षेत्रावर भेट देत आहेत. आपल्या कष्टाला निरीक्षणातून तंत्रज्ञानाची जोड देत आहेत. जैन हिल्सवर आंतरराष्ट्रीय कांदा व लसूण परिषद ११ ते १४ फेब्रुवारीदरम्यान होणार आहे. (Farmer Study Tour Farmers experience invention of agricultural technology jalgaon news)
त्या पार्श्वभूमीवर ५ ते २८ फेब्रुवारीदरम्यान शेतकऱ्यांसाठी अभ्यास दौऱ्याचे आयोजन केले आहे. परिषदेच्या चार दिवस पंचक्रोशीतील निमंत्रित शेतकऱ्यांनी जैन तंत्रज्ञान अभ्यासणे अपेक्षित आहे. जैन हिल्सच्या प्रात्यक्षिक परीक्षेत्रावर खरीप आणि रब्बी हंगामामध्ये घेतल्या जाणाऱ्या ८२ प्रकारच्या विविध कांदाच्या जातींची लागवड करण्यात आली आहे.
तंत्रज्ञानाची माहिती
ड्रीप, मायोक्रो स्प्रिंकलर, रेनपोर्ट, रेनपाईपचा सिंचनासाठी केलेला वापर, यातून बहरलेली कांदा शेती शेतकरी अभ्यासत आहेत. सौरपंपाद्वारे पाणीपुरवठा करताना विहिरीवरील उघड्या जागेचा वापर करताना शेतकऱ्याचे हित कसे साधले जाईल, हे दाखविण्यात आले आहे. जैन ऑटोमेशनद्वारे फर्टिगेशन यंत्रणा, जैन न्युट्रिकेअर यंत्रणा कशी राबविता येईल.
यातून वॉटर सोल्यूबल खते देऊन शेतकऱ्यांना उत्पन्न वाढीचा मार्ग कृषीतज्ज्ञ सांगत आहेत. पाणी व खते जमिनीस न देता पिकांना दिले पाहिजे, यासाठी ठिबक सिंचनाच्या वापरातून खतांची कार्यक्षमता वाढत असते, असे शेतकरी समजून घेत आहेत. केळीच्या जवळपास ३४ प्रकारच्या विविध जातींचा संशोधात्मक लागवड त्याला रानटी जनावरांपासून पीक संरक्षण कसे करता येईल, याची यंत्रणाही पाहता येत आहे.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
ग्रॅण्डनाईनमधील निवडक १४ जातींची लागवड याठिकाणी पाहता येईल. यातून शेतकऱ्यांची सर्वाधिक पसंतीस उतरलेली टिश्यूकल्चर जैन ग्रॅण्डनाईन केळीसह इलाकी, पूवन, बन्थल मोन्थन, नेन्द्रन, रेड बनाना या टिश्यूकल्चरचा बाग शेतकऱ्यांनी अभ्यासला.
जैन स्वीट ऑरेंजच्या पाचही व्हरायटी यासह चिकू, पेरू, भगवा डाळिंब यासह अतिसघन लागवड पद्धतीने आंबा शेतीच्या फळबाग व्यवस्थापनातून समृद्धीचा मार्ग शेतकरी पाहत आहेत. अत्याधुनिक कांदा पेरणी यंत्र, कांदा काढणी यंत्र, बी लागवड यंत्राह कृषी उपयुक्त अवजारांची माहिती शेतकऱ्यांना उपयुक्त ठरत आहे.
तांत्रिक मार्गदर्शन
भविष्यात वाढती लोकसंख्या व उपजाऊ जमिनीचे घटत असलेले क्षेत्र पाहता भविष्यातील शेतीउपयुक्त जमीन कमी होऊ शकते, यासाठी भविष्यातील शेती, फ्युचर फार्मिंग शेतकरी अभ्यासत आहेत.
यात भाजीपालासह औषधी वनस्पतींचे उत्पादने घेण्यासाठी भिंतीवरची शेती म्हणजे व्हर्टिकल फार्मिंग, हायड्रोपोनीक शेती म्हणजे पाण्यातील शेती, एरोपोनीक शेती म्हणजे हवेत शेती, मातीविरहीत शेती, वातारवण नियंत्रित शेती पाहून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा मार्ग मिळत आहे. अभ्यास दौऱ्यात आकाश मैदानावर शेतकरी व जैन कृषितज्ज्ञ यांच्यात प्रश्नोत्तरांचे सत्र होत असते. यात बघितलेले तंत्रज्ञानाविषयी शेतकरी आपल्या शंकांचे निरसण करीत आहेत.
जैन टिश्यूकल्चरमध्ये ग्रॅण्ड नाईन जातीमध्ये नंबर एक असलेला जैन टिश्यूकल्चर पार्क टाकरखेडा येथील १२५ एकर क्षेत्रात विस्तारित असलेल्या पॉलिहाऊस, ग्रीन हाऊसमध्ये केळी व डाळिंब टिश्यूकल्चर प्रायमरी हार्डनिंग,
सेकंडरी हार्डनिंग त्यानंतर सर्व जातिवंत फळबागांसाठी लागणारे रोपे, कलमे त्यात प्रामुख्याने आंबा, जैन स्वीट ऑरेंज, पेरू, सीताफळ यासह भाजीपाल्याची रोपे यात प्रामुख्याने पपई, मिरची, कांदा, टोमॅटो, सॉईललेश बटाटा यांचे प्रात्याक्षिक शेतकरी अनुभवत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.