Agriculture News esakal
जळगाव

Motivational Story : ‘Farmer ते fortuner प्रेरणादायी प्रवास..!

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : इंजिनिअरिंग झाल्यानंतर वडिलांनी दोन पर्याय समोर ठेवले. काळ्या आईची सेवा की नोकरी.. इंजिनिअरींगपेक्षा शेती करण्याचा पर्याय निवडला.. अत्याधुनिक तंत्रज्ञान, ठिबक सिंचन, फर्टिगेशन, ऑटोमेशन, टिश्यूकल्चर या विकसित तंत्रज्ञानाचा अवलंब केला.

यातूनच ५० एकर पासून ११० एकर शेती वाढवली. आज मध्यप्रदेशातील सर्वात समृद्ध गाव म्हणून दापोरा (बऱ्हाणपूर) आहे.

‘फार्मर ते फॉर्च्युनर’ ही समृद्धी केवळ आधुनिक शेतीमुळेच साधता आली, असे अत्यंत प्रेरणादायी बोल योगेश्वर पाटील यांचे आहेत. (Farmer to Fortuner Inspirational journey Farmers have revealed fold of agricultural development Jalgaon News)

जैन हिल्सच्या आकाश मैदानावर ‘फाली’ संमेलनाच्या तिसऱ्या टप्प्यात प्रगत शेतकऱ्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

यात स्वप्नील प्रकाश महाजन, (वाघोदा ता. रावेर), प्रवीण पाटील (महेलखेडी, ता. मुक्ताईनगर), गणेश तराळ, (अंतुर्ली ता. मुक्ताईनगर), अतुल उल्हास चौधरी (सांगवी, ता. यावल), प्रमोद बोरोले (साक्रीफेकरी ता. भुसावळ) या शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला. सहभागी शेतकऱ्यांनी आपआपले अनुभव कथन केले.

यात फार्मसीचे शिक्षण होऊन औषधालय सुरू केले. यातून जनसंपर्क वाढला. आपल्या शिक्षणाचा, जनसंपर्काचा विधायक कार्यासाठी उपयोग व्हावा याच उद्देशाने स्वत: बरोबर इतरही पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडविणारा प्रवास शिरपूर तालुक्यातील प्रगतशील युवा शेतकरी पद्माकर पाटील यांनी फालीच्या विद्यार्थ्यांसमोर आपला कृषिविकासाचा पट मांडला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

‘फाली’ विद्यार्थ्यांनी प्रश्नोत्तर स्वरूपात आपल्या कृषिज्ञानात भर पडेल अशा बाबी जाणून घेतल्या. यावेळी प्रायोजकत्व स्वीकारलेल्या कंपनी प्रतिनिधीदेखील विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

फालीच्या तिसऱ्या टप्प्यात पहिल्या दिवशी जैन इरिगेशनच्या शेती संशोधन केंद्रावरील प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी बघितले.

यात फ्युचर फार्मिंग, एरोपोनिक, हायड्रोपोनिक, जैन स्वीट ऑरेंज, अति सघन पद्धतीने लागवड केलेला आंबा, पेरू व अन्य फळबागांची भेट दिली.

प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी शेतावर जाऊन माहिती घेतली. एक जूनपासून तीन टप्प्यात पार पडत असलेल्या फालीच्या नवव्या संमेलनास महाराष्ट्र, गुजरात मधील ग्रामीण क्षेत्रातील १०८५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan East Assembly Election 2024 Result Live: कल्याण पूर्वमध्ये उद्धव ठाकरे गटाला धक्का; सुलभा गायकवाड यांचा दणदणीत विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: महाराष्ट्रानं मतदान केलंय की ईव्हीएम नं केलंय; आदित्य ठाकरेंचा सवाल

Arjuni-Morgaon Assembly Election Result 2024: अर्जुनी मोरगाव मतदारसंघात राजकुमार बडोले आघाडीवर

Santosh Bangar Won Kalmanuri Assembly Election 2024 Result : संतोष बांगर विजयी; डॉ. संतोष टारफे यांचा पराभव

Ulhasnagar Assembly Election 2024 Result Live: उल्हासनगरमध्ये पुन्हा भाजपाचीच सत्ता; कुमार आयलानी यांचा विजय, ओमी कलानींना धक्का

SCROLL FOR NEXT