एरंडोल (जि. जळगाव) : शेतात पाणी भरण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा विहिरीत पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना पळासदड शिवारातील शेतात शुक्रवारी (ता. २७) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. (Farmers death due to foot slipping in well jalgaon news)
याबाबत माहिती अशी, की अमळनेर दरवाजा परिसरातील मराठे गल्लीत राहणारे देवीदास रामदास जोशी (वय ६२) (स्वस्त धान्य दुकानदार) शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास शेतात पिकांना पाणी भरण्यासाठी गेले होते. दुसऱ्या दिवशी शनिवारी दुपारपर्यंत देवीदास जोशी घरी न आल्यामुळे त्यांचा मुलगा हर्षल जोशी हा मित्रांसह वडिलांना पाहण्यासाठी शेतात गेला.
देवीदास जोशी यांची मोटारसायकल होती; मात्र ते दिसून न आल्यामुळे त्यांनी आजूबाजूच्या शेतकऱ्यांकडे चौकशी केली. दुपारी दोनच्या सुमारास हर्षल जोशी यास विहिरीच्या पाण्यावर बॅटरी तरंगताना दिसली. विहिरीजवळ चिखल असल्यामुळे, तसेच पाय घसरल्याची खूण दिसून आली.
हेही वाचा : ....इथं बनतो आपला लाडका तिरंगा
हर्षल जोशी याने आजूबाजूच्या शेतकऱ्यांना बोलावले व विहिरीत लोखंडी बिलई टाकले असता, देवीदास जोशी यांचा हात त्यामध्ये अडकला. शेतकऱ्यांनी त्यांना बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात नेले असता, वैद्यकीय अधिकारी डॉ. कैलास पाटील डॉ. मुकेश चौधरी, डॉ. रोहित पुराणिक यांनी तपासून मृत घोषित केले.
देवीदास जोशी यांचे मागे पत्नी, दोन मुली, जावई व मुलगा असा परिवार आहे. देवीदास जोशी बंडू महाराज या टोपण नावाने ओळखले जात होते. हर्षल जोशी यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, विकास देशमुख पुढील तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.