Jalgaon News : मे महिन्यात सलग ५ दिवस जास्त तापमानामुळे झालेल्या नुकसानीपोटी केळी पीकविम्याची भरपाई म्हणून उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ४३ हजार ५०० रुपये लाभ मिळणार आहे, अशी माहिती खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांनी दिली. (Farmers will get benefit of Rs 43 thousand per hectare as compensation for banana crop insurance jalgaon news)
पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पीकविमा योजना आंबिया बहारमधील केळी पिकाच्या अनुषंगाने, महावेध माहिती (डेटा) नुसार असे लक्षात आले आहे, की चालू महिन्यात १० ते १५ मे या कालावधीत जिल्ह्यातील ५० महसूल मंडळात सलग ५ दिवस तापमान ४५ डिग्री व त्यापेक्षा जास्त राहिल्याने केळी पिकाला जास्त तापमानाचा फटका बसून, बऱ्याच शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे.
या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ४३ हजार ५०० रुपयेप्रमाणे नुकसान भरपाई मंजूर होणार आहे. तसेच या पूर्वी जानेवारीत सलग ३ दिवस कमी तापमानामुळे प्रतिहेक्टर रक्कम २६ हजार ५०० असे (कमी व जास्त तापमानामुळे झालेल्या नुकसान भरपाईचे मंजूर) मंजूर झाले होते, अशी माहिती खासदार रक्षा खडसे यांनी दिली.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
भरपाईस पात्र तालुके व महसूल मंडळे
रावेर लोकसभा क्षेत्र
सलग पाच दिवस १० ते १५ मे २०२३ दरम्यान जास्त तापमानामुळे झालेले नुकसान असे - रावेर : ऐनपूर, खानापूर, खिर्डी बुद्रुक, खिरोदा, निंभोरा बुद्रुक, रावेर, सावदा. चोपडा : अडावद, लासूर, धानोरा प्र., चोपडा, गोरगावले, हातेड बुद्रुक चाहार्डी. मुक्ताईनगर : घोडसगाव, अंतुर्ली, कुऱ्हे, मुक्ताईनगर. यावल : भालोद, साकाळी, किनगाव बुद्रुक, बामणोद, यावल, फैजपूर. भुसावळ: वरणगाव, पिंपळगाव खुर्द, भुसावळ.
जळगाव लोकसभा क्षेत्र
जळगाव : पिंप्राळा, असोदा, जळगाव शहर, भोकर, म्हसावद, नशिराबाद. अमळनेर : अमळगाव, भरवस, मारवड, नगाव, शिरुड, वावडे. चाळीसगाव : शिरसगाव. धरणगाव : धरणगाव, चांदसर, पाळधी, पिंप्री, साळवा, सोनवद. एरंडोल : एरंडोल, रिंगणगाव. पारोळा : तामसवाडी. भडगाव : भडगाव.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.