farmers worried due to decreasing price of cotton jalgaon news esakal
जळगाव

Jalgaon Cotton News : कापसाचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांची कोंडी

गेल्या काही दिवसांपासून कापसाचे खेडा खरेदीत क्विंटलमागे दोनशे ते तीनशे रुपयांची घसरण झाल्याने कापूस उत्पादक कोंडीत सापडले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Cotton News : गेल्या काही दिवसांपासून कापसाचे खेडा खरेदीत क्विंटलमागे दोनशे ते तीनशे रुपयांची घसरण झाल्याने कापूस उत्पादक कोंडीत सापडले आहेत.

कापसाचे सर्वसाधारण दर दोन वर्षांपूर्वी १४ हजार ३०० रुपयांपर्यंत पोचले होते. (farmers worried due to decreasing price of cotton jalgaon news)

मागीलवर्षी ९ हजार २०० ते ९ हजार ५०० रुपये क्विंटलपर्यंत भाव जाऊन हंगाम अखेर ७ हजार ५०० रुपयांवर आले होते. दहा हजारांच्या आशेवर असलेल्या अनेक शेतकऱ्यांचा कापूस अजूनही गावागणिक दोन, तीन शेतकऱ्यांकडे पडून आहे.

गेल्या काही वर्षांचा आढावा घेतल्यास वर्षांअखेर व नाताळच्या दरम्यान कापसाचे दर काहीसे कमी झाल्याचे दिसून येतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर दरातील घडामोडी, शिल्लक साठा आणि यावर्षी उत्पादीत होणारा कापूस या सर्वांचा परिणाम पसाच्या बाजारभावातील दराशी येत असतो.

यावर्षी बोंडअळीमुळे कपाशीचे पीक शेतकऱ्यांना परवडणारे नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या गहू, मका, भुईमुगाची पेरणी व उन्हाळी कांदा लागवड सुरू असल्याने शेतकऱ्यांना पैशांची गरज आहे. त्यामुळे बहुसंख्य शेतकरी कापूस विक्री करण्याच्या मनःस्थितीत असले तरी भाव नसल्याने शेतकऱ्यांची सध्या घुसमट सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT